आमदार जितेश अंतापूरकरांनी कॉंग्रेसचा हात सोडला, भाजपचे कमळ हाती घेणार?
नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकरांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. अंतापूरकर हे अशोक चव्हाणांचे निकटवर्ती मानले जातात. आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळणार की नाही याबद्दल साशंक असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वीच जितेश अंतापूरकर आणि हिरामण खोसकर यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी भेटीबाबत अंतापूरकर यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी, मी माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांमध्ये जितेश अंतापूरकर यांचा देखील समावेश असल्याचा काॅंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना विश्वास होता. काँग्रेस पक्षाकडून या फुटीर नेत्यांवर कठोर कारवाई होईल, असे सांगितले जात होते मात्र, काँग्रेस हायकमांडने क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर थेट कारवाई करण्याऐवजी त्यांना गाफील ठेवून विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊ नये, असे आदेश स्थानिक नेतृत्त्वाला दिल्याची चर्चा होती.
जितेश अंतापूरकर यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून तिकीट नाकारले जाण्याच्या भीतीने हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. आगामी राजकारणातील हा धोका लक्षात घेऊनच जितेश अंतापूरकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. शुक्रवारी त्यांचा भाजपप्रवेश होऊ शकतो.
कोण आहेत जितेश अंतापूरकर?
जितेश अंतापूरकर 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत देगलूर मतदारसंघातून काॅंग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. त्यांची संपूर्ण कारकिर्द काॅंग्रेस पक्षाशी निष्ठा दाखवली आहे. त्यांना आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत. एवढेच नाही तर शिक्षण आरोग्य समाजकल्याण, पायाभूत सुविधा यांच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले आहे. मतदारसंघातील लोकांशी जवळीक संवाद कौशल्य यामुळे ते लोकप्रिय आहेत.












Click it and Unblock the Notifications