Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नाना नव्हे आता बंटी दादा पर्व!, हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वीकारली कॉंग्रेस प्रदेशाध्यपदाची जबाबदारी

Harshwardhan Sapkal takes charge as Maharashtra Congress president : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईतील टिळक भवनात पदभार स्वीकारला. यावेळी राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक, मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधी मंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे या नेत्यांची उपस्थिती होती.

सपकाळांचे नाव समोर येताच अनेकांना बसला धक्का

काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांची नावे चर्चेत असताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव समोर आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. इतकेच नाही तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील याबाबत आश्चर्य व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.

Harshwardhan Sapkal

त्यांच्या निवडीमुळे पक्षातील काही वरीष्ठ नेते नाराज असल्याचे देखील सांगितले जात आहे. त्यामुळे आजच्या समारंभाला अनेक मोठ्या नेत्यांनी दांडी मारली.तर मला वैयक्तिक काम असल्यामुळे मी समारंभाला उपस्थित नसल्याचे काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी म्हटले आहे.

कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ (Who is Harshvardhan Sapkal)

हर्षवर्धन सपकाळ हे बुलढाणा मतदार संघाचे आमदार झालेले आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी अनेक वर्ष राष्ट्रीय स्तरावर काम केले आहे. पक्षाचे उपाध्यक्ष असताना राहुल गांधी यांनी स्थापन केलेल्या कार्यगटाचे सुद्धा ते सदस्य होते.

राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. उत्तराखंड आणि पंजाबसह अनेक राज्यांच्या निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेस विधिमंडळ पातळीवर सुद्धा अभ्यासू आणि आक्रमक आमदार म्हणून परिचित आहेत.

हर्षवर्धन सपकाळ यांची कारकिर्द

एनएसयुआय, युवक काँग्रेसच्या माध्यमातून हर्षवर्धन सपकाळ विद्यार्थी, युवक चळवळीत सक्रीय होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकूल वासनिक यांच्या माध्यमातून ते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या थेट संपर्कात आले. त्यानंतर वऱ्हाडासह संपूर्ण राज्यात युवक काँग्रेसची मजबूत बांधणीत सपकाळ यांची भुमिका महत्वपूर्ण राहिली. त्यामुळे राहुल गांधी ब्रिगेडमध्ये महाराष्ट्रातील खासदार राजीव सातव आणि हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी लागली होती.

जिल्हा परिषदेचे सदस्य, अध्यक्ष, आमदार, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव ते पक्षाचे अखिल भारतीय पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पदापर्यंत त्यांनी काम केले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या 'गुड बुक' मध्ये सपकाळ असल्याचे मानले जाते.

गुजरात निवडणुकीतही मोठी जबाबदारी

बुलडाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना बंटी दादा म्हणूनही ओळखले जाते. काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर 2017 मध्ये गुजरात निवडणुकीची मोठी जबाबदारी काँग्रेसने सोपवली होती. काँग्रेसने त्या वेळी गुजरात निवडणुकीसाठी अशोक सिंह गहलोत यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार केली होती. यामध्ये सहप्रभारी म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+