काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमधून उमेदवार बदलला, वाचा कोणाला कुठून संधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने सोमवारी रात्री 4 उमेदवारांची घोषणा केली आहे तर झारखंड विधानसभेसाठी 2 उमेदवारांची अशी एकूण 6 उमेदवारांची घोषणा केली आहे.
काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत 4 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. या यादीमध्ये कुलाबा विधानसभा मतदारसंघात हिरा देवसी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात साजिद खान, सोलापूर मध्य चेतन नरोटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कोल्हापूर उत्तरमध्ये उमेदवार बदलला
तसेच अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात उमेदवार बदलण्यात आला आहे. याआधी कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या उमेदवारीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे आता कोल्हापूर उत्तरमध्ये मधुरीमाराजे छत्रपती यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
हे ही वाचा : काँग्रेसने 4थी यादी केली जाहीर; 14 जणांचा समावेश; औरंगाबाद पूर्व व अंधेरी पश्चिममधील उमेदवार बदलले!
महाराष्ट्रातील या मतदारसंघाचा समावेश
- अकोला वेस्ट - साजीद खान मन्नान खान
- कुलाबा - हिरा देवासी
- सोलापूर शहर मध्य - चेतन नरोटे
- कोल्हापूर उत्तर - मधुरिमाराजे छत्रपती
झारखंड विधानसभेसाठी 2 उमेदवारांची घोषणा
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी देखील क़ॉंग्रेसने दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. यात प्रामुख्याने बोकारा मतदारसंघातून श्वेता सिंग तर धनबाद मधून अजय दुबे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications