काहींनी दिले धक्के, तर काही ठरले पक्के..! पहा भाजपच्या मंत्रीपदाच्या यादीच्या महत्त्वाच्या गोष्टी
महायुतीच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी आज झाला. नागपूरात झालेल्या या नेत्रदीपक शपथविधी सोहळ्यात, भाजपकडून 19 मंत्र्यांनी आज शपथ घेतली. त्यात सात जणांना अनपेक्षित संधी मिळाली. हे सातही जण पहिल्यांदाच मंत्री झाले. तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार व रवींद्र चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांना डच्चू देण्यात आला. दुसरीकडे महाजन, विखे-पाटील, बावनकुळे, लोढा यांसारखे नेते पुन्हा मंत्रीमंडळात दिसले. भाजपच्या या पहिल्या यादीबाबत काहींचे सुखद धक्के दिले तर काही जण मंत्रीपदासाठी पक्के ठरले.

या नव्या चेहऱ्यांना सधी
भाजपकडून यावेळी नितेश राणे, शिवेंद्रसिंह भोसले, पंकज भोईर, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ,आकाश फुंडकर, जयकुमार गोरे यांच्यासह काही जणांना प्रथमच मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. या सर्व जणांनी पहिल्यांदाच मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच जल्लोष केला.
भाजपच्या या मंत्र्यांनी घेतली शपथ
गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, जयकुमार रावल, नितेश राणे, शिवेंद्रसिंह भोसले, पंकज भोईर, गणेश नाईक, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ, अतुल सावे, संजय सावकारे, आकाश फुंडकर, अशोक उईके, जयकुमार गोरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.












Click it and Unblock the Notifications