लाडक्या बहिणींकडून शंभर-शंभर रुपये घेणाऱ्या ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

हिंगोली : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी बहिणींना रहिवासी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रत्येकी शंभर-शंभर रुपयांची वसुली होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती.

Gram sevak

पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याची गंभीर दखल घेत दोषी आढळलेल्या हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा येथील ग्रामसेवकावर गटविकास अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा व भाटेगाव येथील ग्रामसेवक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना अर्ज करण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्रा साठी अनधिकृत रित्या वसुली करत होता असा त्याच्यावर आरोप आहे.

महिलांनी रहिवासी प्रमाणपत्रासाठी मोठी गर्दी केल्यानंतर या गर्दीचा फायदा उचलत ग्रामसेवक मुकुंद चांदोजी घनसावंत याने महिलांकडून प्रत्येकी 100 रुपये वसुली सुरू केली होती. शिवाय त्यांना कोणत्याही प्रकारची अधिकृत पावतीही महिलांना देण्यात येत नव्हती. या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी आवाज उठवला. मुख्यमंत्री व प्रशासनाने रहिवासी प्रमाणपत्र विनामूल्य देण्याचे आदेश असतानाही संबंधित ग्रामसेवकाने लाडक्या बहिणीकडून पैसे उकळणे सुरू केले होते.

व्हिडिओद्वारे पोलखोल

संबंधित ग्रामसेवक पैसे घेत असल्याचे नागरिकांनी व्हिडिओ काढले आणि व्हायरलही केले. या प्रकरणी चौकशीनंतर कळमनुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या तक्रारीवरून आरोपी ग्रामसेवक मुकुंद चांदोजी घनसावंत याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 198, 318 (2 ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सदर ग्रामसेवकाला तडकाफडकी निलंबितही करण्यात आले होते. त्यानंतर गुन्हा दाखल झाल्याने आता जिल्हाभरात खळबळ माजली आहे. अशा प्रकारे दिशाभूल करून शासन आदेशाची अवहेलना करणाऱ्या आणि नागरिकांची फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध जिल्ह्यात पहिल्याच गुन्हा दाखल झाला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+