Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आत्महत्येपुर्वी हातावरचे अक्षर कुुणाचे? फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी फडणवीसांची विधानसभेत माहिती

CM Fadnavis Reveals Phaltan Doctor Suicide : फलटण येथील कार्यरत असलेल्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावर आज (९ डिसेंबर) विधानसभेत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर निवेदन केले. भाजपचे आमदार अमित साटम यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना फडणवीस यांनी तपासातील धक्कादायक माहिती उघड केली. पोलीस उपनिरीक्षक (PSI) बदने याने डॉक्टर तरुणीचे शारीरिक शोषण केले, तसेच दुसऱ्या आरोपीनेही तिच्या परिस्थितीचा फायदा घेतला, ज्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलले, असे स्पष्ट झाले आहे.

CM Fadnavis Reveals Phaltan Doctor Suicide

फलटण डॉक्टर तरुणीचे मृत्यू प्रकरण काय?

सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी तिने आपल्या हातावर काही नावे आणि माहिती लिहून ठेवली होती. या घटनेमुळे समाजात दुःखाची आणि संतापाची लाट पसरली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी शासनाने तातडीने एसआयटी समिती (SIT) नेमली असून, न्यायालयीन चौकशीसाठी आयोगही नेमण्यात आला आहे.

सीएम फडणवीस यांनी सभागृहात दिलेली धक्कादायक माहिती

मीडिया रिपोर्टनुसार, विधानसभेत आज आमदारांनी, 'गुन्हे दाखल असलेल्या आरोपींच्या वैद्यकीय प्रमाणपत्रात फेरफार करण्याचा दबाव डॉक्टरवर अटकेतील आरोपींपैकी एकाने टाकला होता का?', असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नांना उत्तर देताना फडणवीस यांनी या प्रकरणाची महत्त्वपूर्ण माहिती दिली.

हातावरील अक्षर डॉक्टर तरुणीचेच

न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) अहवालानुसार, मृत डॉक्टर महिलेने आपल्या हातावर जे काही लिहिले होते, ते तिचेच हस्ताक्षर आहे, हे निश्चित झाले आहे. आरोपी पोलीस अधिकारी बदने याच्याकडील चॅट्सच्या माहितीनुसार, बदनेने तरुणीची फसवणूक करून तिचे शारीरिक शोषण केले असल्याचे लक्षात येते. बदनेने लग्नाचे आमिष दाखवले होते आणि नंतर त्याने वेगळी भूमिका घेतली, ज्यामुळे तिचे शोषण झाले असे फडणवीस यांनी सांगितले.

वैद्यकीय प्रमाणपत्राचा दबाव

सदर महिला वैद्यकीय अधिकारी असल्यामुळे अटकेतील आरोपी अटकेसाठी फीट आहे की नाही, याचे प्रमाणपत्र तिला द्यावे लागत होते. तिने काही महत्त्वाच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना अनफीट असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. यामुळे पोलिसांनी तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते आणि त्यानंतर चौकशी झाली होती. मात्र, फडणवीस यांनी स्पष्ट केले की, ही सगळी बाब आत्महत्येच्या पाच महिने आधीची आहे.

दुसऱ्या आरोपीनेही घेतला फायदा

आत्महत्येच्या घटनेत एकीकडे पीएसआय बदनेने केलेली फसवणूक होती, तर दुसरीकडे दुसऱ्या आरोपीनेही डॉक्टर तरुणीच्या या परिस्थितीचा फायदा घेऊन तिची फसवणूक केली. "एकीकडे बदनेने केलेली फसवणूक आणि दुसरीकडे त्या परिस्थितीचा फायदा घेऊन दुसऱ्या आरोपीने केलेली फसवणूक, यामुळेच त्या दोघांचे नाव हातावर लिहून तिने आत्महत्या केली," असे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले. तपासाची कार्यवाही पूर्ण झाल्यावर अंतिम निष्कर्ष जाहीर केला जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+