Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आत्मसमर्पण करा, नाहीतर.. CM फडणवीसांचा नक्षलवाद्यांना आर या पारचा 'हा' इशारा, वाचा 6 मुद्यात भाषण

CM Fadnavis Naxal warning Gadchiroli Surrender or Face Action : नक्षलवादी प्रमुख भुपतीसह ६१ जणांच्या आत्मसमर्पणानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीतून नक्षलवादी चळवळीत सक्रिय असलेल्या उर्वरित बोटावर मोजण्याइतक्या लोकांना कडक इशारा दिला आहे. मोदी सरकारच्या धोरणानुसार आता नक्षलवाद्यांसमोर दोनच पर्याय उरले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

CM Fadnavis Naxal warning Gadchiroli

1. न्याय मिळू शकत नाही हा संभ्रम तयार केला

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "संभ्रम निर्माण करण्यात आला की, भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये आपल्याला न्याय मिळू शकत नाही. त्यामुळे, या संविधानाने तयार केलेली व्यवस्था मोडून टाकली पाहिजे आणि 'जंगलाचे राज्य' चालू करणारी एक नवीन व्यवस्था आपण उभी करू, अशा प्रकारचे स्वप्न त्यावेळी दाखवण्यात आले. त्यावेळी अनेक तरुण या स्वप्नाला भुलले. त्यांना असं वाटलं की एक नवीन व्यवस्था सुरू होते, त्या व्यवस्थित समता येईल. पण त्यांना याची कल्पना नव्हती की, समता जर येऊ शकते, तर ती केवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातूनच येऊ शकते. याची कल्पना त्यांना नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेक आमचे तरुण आणि विशेषतः आमचे आदिवासी समाजातले अनेक लोक या चळवळीच्या नादी लागले. हातामध्ये बंदूक आली, मोठी स्वप्ने होती. पण हळूहळू तुमचा खरा चेहरा समोर यायला लागला.

Take a Poll

2. नक्षलवादी चळवळ अशी उभी राहीली..

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "40 वर्षांपूर्वी ज्यावेळी या ठिकाणी चळवळ सुरू झाली, त्यावेळी सुरुवात करणारे, त्याला बौद्धिक आणि सर्व प्रकारचे लॉजिक देणारे, अशा प्रकारचे तुम्ही (भुपती) उपस्थित होते. तुमचे बंधू हे देखील त्याच्यामध्ये होते. आणि मग हळूहळू ही नक्षलवादी चळवळ तुमच्या नेतृत्वाखाली सुरू झाली. तेलंगणाचा काही भाग, महाराष्ट्राचा गडचिरोलीचा भाग आणि बाजूचा छत्तीसगडचा भाग, या सगळ्या भागांमध्ये एक प्रकारे या संपूर्ण नक्षलवादी मोहिमेचे मोरक्या म्हणून तुम्ही जबाबदारी स्वीकारली आणि एक प्रचंड मोठा लढा उभा केला."

3. नक्षलवादाविरोधातील सरकारचे धोरण

"देशामध्ये मोदीजींनी (पंतप्रधान) एक धोरण सुरू केले आहे. एकीकडे प्रशासन आणि विकास हा समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे, आणि दुसरीकडे जे लोक शस्त्र घेऊन हिंसाचार करत आहेत, त्यांच्यासमोर दोनच विकल्प (पर्याय) राहिले पाहिजेत. एक तर त्यांनी शस्त्र सोडून मुख्य व्यवस्थेत यायचं, अन्यथा पोलीस कारवाईला सामोरे जायचं. अशा प्रकारची अत्यंत मोठी मोहीम देशामध्ये मोदीजींनी सुरू केली. गेल्या काही वर्षांमध्ये आमच्या देशाचे गृहमंत्री श्री. अमित भाई शहा यांनी या देशातील माओवादाला हद्दपार करण्याच्या संदर्भात मोदीजींच्या नेतृत्वाखाली रणनीती तयार केली. आज आपण पाहतो की, अंतर्गत सुरक्षेच्या क्षेत्रात अतिशय मोठ्या प्रमाणात देशातील माओवादाचे उच्चाटन होत आहे.

4. नक्षलवादी चळवळीला ओहोटी

या संपूर्ण मोहिमेमध्ये पोलिसांनी काम केले आणि सातत्याने एकीकडे विकास कामांच्या माध्यमातून आपण (नक्षलवाद्यांची) नवीन भरती बंद केली, आणि दुसरीकडे जंगलामध्ये सातत्याने मोहिमा करून त्या ठिकाणी नक्षलवाद्यांना/माओवाद्यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडण्याचे काम देखील आमच्या माध्यमातून झाले. त्याचाच परिणाम आहे की, हळूहळू भरती तर बंद झाली, पण दुसरीकडे नक्षलवादी चळवळीला ओहोटी लागलेली आपण पाहिली.

5. एकतर स्वागत किंवा परिणाम भोगावे लागतील - थेट इशारा

फडणवीस म्हणाले, "तुम्ही (भुपती) एक हुशार नेता होता आणि तुमच्या नेतृत्वाखाली आत्मसमर्पण झाले. तुम्ही आणि तुमच्यासोबत ६१ जणांनी शस्त्रे सरेंडर करणे, हा एक इतिहास आहे. आता जर विचार केला, तर मागच्या काळात आपण गडचिरोलीमधून उत्तर गडचिरोली पूर्णपणे नक्षलवादमुक्त केले आहे. अगदी बोटावर मोजण्याइतके लोक अजून बाकी आहेत. मी त्यांनाही आव्हान करतो की, त्यांनीही आता तात्काळ मुख्य धारेमध्ये यावे, या ठिकाणी आत्मसमर्पण करावे. त्यांनी आत्मसमर्पण केले, तर आम्ही त्यांचे स्वागत करू, अन्यथा त्या ठिकाणी परिणामांना त्यांना सामोरे जावे लागेल." आता या ठिकाणी नक्षलवाद शंभर टक्के हद्दपार होणार, अशा प्रकारच्या परिस्थितीत आपण पोहोचलेलो आहोत आणि या लढाईचे नेतृत्व गडचिरोली करत आहे.

6. नक्षलवादी वैचारीक लढाईतही हरले

मला विश्वास आहे की, आता या ठिकाणी त्यांनी (भुपती आणि सहकाऱ्यांनी) आपल्या प्रक्रियेच्या संपर्कात येऊन आत्मसमर्पण केले. आता उरलेले नक्षलवादी छत्तीसगडमध्येही (वैचारिक लढाईत) मोठ्या प्रमाणात हारले आहेत. (आत्मसमर्पण करणाऱ्यांना) चांगल्या प्रकारची नोकरी देण्याची तयारी सरकारने दाखवलेली आहे आणि त्यासोबत चांगली व्यवस्था ही करण्याचं काम देखील आपण करून दाखवलं आहे. आता पश्चात्ताप न होता त्याचं (भुपतीचे) जीवन सुधारलेला आहे, अशा प्रकारची व्यवस्था आपण सगळे करून देऊ. आज मला या गोष्टीचा आनंद आहे."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+