सरकारला शक्ती द्या, तुमच्या खात्यात दीडचे दोन, नंतर तीन हजार टाकू - लाडक्या बहिणींना CM शिंदेंची साद
Ladki Bahin Yojana Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना दीड हजार रुपयांपासून सुरु केली आहे. पुढे सरकारची ताकद वाढली की, दीडऐवजी पावनेदोन हजार होतील, नंतर दोन, तुम्ही बळ दिलं तर सव्वा दोन आणि मग पुढे तीन हजारांपेक्षाही जास्त रक्कम देण्याची तयारी ठेवू फक्त तुम्ही सरकारला शक्ती द्या तेवढ्या ताकदीने तुमच्या खात्यात पैसे टाकू असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लाडक्या बहिणींना दिलं.
महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात सातारा इथं ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आदींची उपस्थिती होती.

'लाडकी बहिण'साठी 35 हजार कोटींची तरतूद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधक म्हणतात की, राज्यसरकारकडं निधी नाही पण मी तुम्हाला सांगतो आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी 35 हजार कोटींची तरतूद सरकारने केली आहे. ही योजना एका दिवसात झाली नाही. पहिल्या दिवसांपासून आम्ही फक्त आणि फक्त राज्यातील सामान्य जनतेचाच विचार केला आहे. शेतकरी, कामगार, लाडके भाऊ, ज्येष्ठ यांच्यासाठी योजना आणण्याचा विचार केला.
विरोधक म्हणायचे सरकार बदलेल पण मजबूत झालं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अजितदादांच्या रुपात आम्हाला तिसरा सहकारी भेटला आणि आम्हाला ताकद भेटली. विरोधक आमचे सरकार स्थापन झाल्यापासून रोज सरकार पडेल सरकार पडेल हे महिन्यातून दोन महिन्यातून चार महिन्यातून एकदा म्हणायचे. नंतर मुख्यमंत्री बदलणार असंही म्हणायचे पण काहीच बदललं नाही. सरकार बदललं नाही उलट सरकार मजबूत होत गेलं.
पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजारांची किंमत काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, लाडक्या बहिणींच्या खात्यात आज पंधराशे ते तीन हजार रुपये आज जमा होत आहेत याचं मला समाधान आहे. सरकार सामान्यांचं आहे. मी स्वतः सामान्य, शेतकरी कुटुंबातून पुढे आलेलो आहे. सोन्याचा चमचा घेऊन आम्ही आलेलो नाही. जे पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड आणि तीन हजारांची किंमत कळणार नाही. ही किंमत सर्वसामान्य कुटुंबातील लाडक्या बहिणींना आहे. म्हणूनच ही योजना आपल्या आशीर्वादाने यशस्वी झाली आहे.
निवडणुकीत शक्ती द्या...पैसे देऊ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ही योजना दीड हजार रुपयांपासून सुरु केली आहे. पुढे सरकारची ताकद वाढली की, दीडऐवजी पावनेदोन हजार होतील नंतर दोन होतील तुम्ही बळ दिलं तर सव्वा दोन ते तीन हजारांपेक्षाही जास्त रक्कम देण्याची तयारी ठेवू. सरकारला शक्ती द्या तेवढ्या ताकदीने तुमच्या खात्यात पैसे टाकू हे काम महायुती सरकार करणार आहे.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications