विरोधकांना कितीही खटाटोप करु द्या - लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा 'मविआ'वर निशाणा
CM Eknath Shinde on Ladki Bhin Yojana : माझी लाडकी बहिण योजनेचे श्रेय लाटण्यासाठी महाविकास आघाडीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे बोर्ड आता चमकू लागले आहेत. योजना आम्ही काढली आणि ते त्या बोर्डवर स्वतःचे फोटो लावत आहेत. हा मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रयत्न आहे.
आम्ही तुमच्या मागे आहोत, विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरीही हीयोजना बंद होणार नाही असं आश्वासनही मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी राज्यातील लाभार्थी महिलांना दिलं.

खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा
मुख्यमंत्री शिंदे आज रत्नागिरी इथं 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' प्रचार-प्रसार कार्यक्रमात बोलत होते, यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसह विरोधकांचा समाचार घेतला. तसंच "ज्यांनी लाडकी बहिण योजनेत खोडा घातला, त्यांना जोडा दाखवा" असे आवाहन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी लाडक्या बहिणींना केलं.
विरोधक राजकारणच करत आहेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्र महिलांना सन्मान देणारा महाराष्ट्र आहे. बदलापूर प्रकरणातील नराधमावर कठोर कलमं लावून त्याला फाशी व्हावी हा प्रयत्न आमचा आहे. आम्ही यासाठी निर्देश दिले आहेत. संस्थाचालकाची सुचना करण्याची मी दिली आहे. एवढं सर्व झाल्यानंतर आणखी काय हवं आणखी एकच की, तिथं विरोधकांना राजकारण करायचं होतं असाही त्यांनी आरोप केला. विरोधकांना फक्त आणि फक्त राजकारण करायचे होते.
(ही बातमी अपडेट होत आहे..)












Click it and Unblock the Notifications