अमोल मिटकरींच्या कारची तोडफोडी करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा हार्टअटॅकने मृत्यू!
राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी व त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ला प्रकरणात मनसेच्या तेरा कार्यकर्ते व नेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात मनसे सैनिक जय मालोकार याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
गुन्हा दाखल झालेल्या मध्ये जय मालोकार यांचे नाव असून त्याच बरोबर इतर 13 लोकांचे नाव समोर आली आहेत. या सर्व प्रकरणात पोलीस मनसे सैनिकांचा शोध घेत आहेत.

राज ठाकरेंवर केलेल्या आरोपानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडली. त्यामध्ये जय मालोकार यांचाही सहभाग होता. या राड्यानंतर जय मालोकार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या राड्यात झालेल्या झटापटीनंतर जय मालोकार यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू झाले. पण आता त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं.
जय मालोकर याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. आपण लवकरच जय मालोकार याच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर कार्यकर्त्यांच्या बळावर राजकारण करू पाहणाऱ्या राज ठाकरे यांनी आता या मृत मनसैनिकाच्या कुटुंबीयांना भेटायला यावं असं आवाहनही यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी केले.
नेमका वाद काय?
राज ठाकरेंनी पुण्यातील पुरस्थितीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी सुपारीबहाद्दरांनी अजितदादांबद्दल बोलू नये, असे म्हणत राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले होते.
यावेळी अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख थेट सुपारीबाज असा केला होता. टोल आणि भोंग्याचे आंदोलन फसलेल्या सुपारीबहाद्दरांनी अजित पवारांवर बोलू नये. हे सुपारी बहाद्दर टोल नाक्याचे आंदोलन असेल, भोंग्याचे आंदोलन असेल किंवा आणखी कुठले आंदोलन असेल त्यांना जीवनात कुठल्याही आंदोलनाला यश आले नाही. राज ठाकरेंना एनडीआरएफचा साधा लाँग फॉर्मही सांगता आला नाही म्हणजे राजकारणातील हा सर्वात मोठा जोक आहे. राज ठाकरे या व्यक्तीची विश्वासार्हता संपली आहे.
महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखा आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले होते.
..म्हणून वाहनावर हल्ला
अमोल मिटकरी यांच्या प्रत्त्युत्तरानंतर मनसेच्या अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया येत होत्या. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याचा बदला म्हणून त्यांची गाडी फोडल्याचं बोललं जात आहे. यावेळी अकोल्यात मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी अमोल मिटकरींची गाडीची तोडफोड असून दोन्ही गटातील कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत.
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस










Click it and Unblock the Notifications