सिडकोच्या 26 हजार घरांच्या किमती जाहीर! जाणून घ्या किती आहे किंमत अन् अर्ज करण्याची तारीख
Cidco Lottery announced Prices : सिडको महामंडळाने मुंबईतील 26 हजार घरासाठी काढलेल्या लाॅटरीत मोठी अपडेट दिली आहे. आता सिडकोच्या घराच्या किमती जाहीर करण्यात आल्या असून 25 लाखांपासून 97 लाखांपर्यंत दर आहेत.
सिडकोनं "माझे पसंतीचे सिडकोचे घर" या 26000 घरांच्या महागृहनिर्माण योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीची अंतीम तारीख 10 जानेवारी 2025 पर्यंत ठेवलेली आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप अर्ज दाखल केले नाहीत त्यांना अर्ज करण्याची मोठी संधी आहे.

सिडकोच्या लाॅटरीसाठी तीनवेळा मुदतवाढ
सिडकोनं "माझे पसंतीचे सिडकोचे घर" या 26000 घरांच्या गृहनिर्माण योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ दिली होती. या योजनेत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 10 जानेवारी 2025 पर्यंत असल्याने आता अर्जाची संख्या वाढू शकते.
कुठे आहेत घरे?
सिडकोच्या या योजनेंतर्गत 26 हजार सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटांसाठी नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सिडकोकडून घरांच्या किंमती जाहीर
सिडकोनं 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' या योजनेतील 26 हजार घरांच्या किमती जाहीर केल्या, त्यात EWS अर्थात आर्थिक दुर्बल घटक गटासाठी 25 ते 48 लाखांपर्यंत घरांच्या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत. तर, अत्यल्प (LIG) गटासाठी घरांच्या किमती 34 लाखांपासून 97 लाखांपर्यंत आहेत.
आर्थिक दुर्बल घटक (EWS ) गटात अर्ज करणाऱ्यांसाठी म्हणजे ज्यांचं वार्षिक आर्थिक उत्पन्न सहा लाखांपर्यत आहे त्या गटासाठी घरांच्या किमती या 25 लाखापासून 48 लाखांपर्यंत ठेवण्यात आल्या आहेत.
अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) आर्थिक वार्षिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा जास्त आहे या गटामध्ये घराच्या किमती या 40 लाखांपासून ते 97 लाखांपर्यंत आहेत.
या भागात सिडकोच्या घरासाठी हे आहेत दर
गट EWS ( आर्थिक दुर्बल घटक )
तळोजा सेक्टर 28 - 25.1 लाख
तळोजा सेक्टर 39 -26. 1 लाख
खारघर बस डेपो - 48. 3 लाख
बामणडोंगरी -31. 9 लाख
खारकोपर 2A, 2B -38.6 लाख
कळंबोली बस डेपो - 41.9 लाख
अल्प उत्पन्न गट एलआयजी
पनवेल बस टर्मिनस - 45.1 लाख
खारघर बस टर्मिनस- 48.3 लाख
तळोजा सेक्टर 37 - 34.2 लाख 46.4 लाख
मानसरोवर रेल्वे स्टेशन -41.9 लाख
खांदेश्वर रेल्वे स्टेशन -46.7 लाख खारकोपर ईस्ट - 40.3 लाख
वाशी ट्रक टर्मिनल - 74.1 लाख
खारघर स्टेशन सेक्टर वन A- 97.2 लाख












Click it and Unblock the Notifications