मोठी बातमी..! नव्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर; पहा कुणाला कोठून मिळाली संधी?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री उशीरा पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. या यादीत अपेक्षेप्रमाणे मंत्री धनंजय मुंडे यांना डच्चू देण्यात आला. या यादीचे आणखी एक वैशिष्ट्य राहिले ते म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दोन जिल्ह्यांची पालकमंत्रीपदे मिळाली आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झाल्यावर आता बीडचे पालकमंत्री म्हणूनअजित पवार हे काम पाहणार आहेत.

धनंजय मुंडेंना वगळले
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयीत आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. आज शिर्डीत सुरु असलेल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनासही मंत्री मुंडे यांनी दांडी मारली होती. तेव्हाच मंत्री मुंडे यांना पक्षातूनच विरोध होत असल्याचे जाणवले होते. आज पालमंत्रीपदाच्या यादीत त्यांचे नाव कट करण्यात आले. आता उपमुख्यमंत्री अजित पवार हेच बीडचे पालकमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.
कोणत्या जिल्ह्यात कोण पालकमंत्री
गडचिरोली - देवेंद्र फडणवीस
नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे - एकनाथ शिंदे
पुणे - अजित पवार
बीड - अजित पवार
सिंधुदुर्ग- नितेश राणे
अमरावती - चंद्रशेखर बावनकुळे
अहिल्यानगर - राधाकृष्ण विखे पाटील
वाशिम - हसन मुश्रीफ
सांगली - चंद्रकांत पाटील
सातारा -शंभुराजे देसाई
छत्रपती संभाजी नगर - संजय शिरसाट
जळगाव - गुलाबराव पाटील
यवतमाळ - संजय राठोड
कोल्हापूर - प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ
अकोला - आकाश फुंडकर
भंडारा - संजय सावकारे
बुलढाणा - मकरंद जाधव
चंद्रपूर - अशोक ऊईके
धाराशीव - प्रताप सरनाईक
धुळे - जयकुमार रावल
गोंदिया - बाबासाहेब पाटील
हिंगोली - नरहरी झिरवळ
लातूर - शिवेंद्रसिंग भोसले
मुंबई शहर - एकनाथ शिंदे
मुंबई उपनगर -आशिष शेलार/ सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
नांदेड - अतुल सावे
नंदुरबार - माणिकराव कोकाटे
नाशिक - गिरीष महाजन
पालघर - गणेश नाईक
परभणी - मेघना बोर्डीकर
रायगड - अदिती तटकरे
सिंधुदुर्ग- नितेश राणे
रत्नागिरी - उदय सामंत
सोलापूर - जयकुमार गोरे
वर्धा - पंकज भोयर
जालना - पंकजा मुंडे












Click it and Unblock the Notifications