छत्रपती संभाजीनगर : बारश्याचा कार्यक्रम आटोपून येतांना कुटुंबावर काळाची झडप, आई बाळासह चौघांचा मृत्य

छत्रपती संभाजीनगर मधून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. भरधाव वेगात येणा-या स्कॉर्पिओने दुभाजक ओलांडून दुस-या कारला जोराची धडक दिली आहे. मिळालेल्या माहीतीनुसार छत्रपती संभाजीनगरहून पुण्याकडे जात असताना मोठा अपघात झाला आहे. या अपघातात चार जणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात वाळूज जवळील लिंबेजळगाव या गावाजवळ घडला आहे. हा अपघात हा एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे.

Accident News

मिळालेल्या माहीतीनुसार अजय बेसरकर हे कुटुंबासह पुण्याला जात असताना दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चालकाने भरधाव वेगात असणा-या स्कॉर्पिओने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. दहा वर्षांनंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून कुटुंब पुण्याकडे जात असताना ही हृदयद्रावक घटना घडली. दहा वर्षानंतर झालेल्या बाळाचे बारश्याचा कार्यक्रम आटोपून पुण्याला जाणाऱ्या बेसरकर कुटुंबाच्या कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 4 जणांचा दुदैवी मृत्यू झाला आहे.

या अपघातात अजय बेसरकर , मृणालिनी अजय बेसरकर ,आशालता हरिहर पोपळघट,अमोघ देसरकर ,दुर्गा सागर गीते यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशाल चव्हाण नावाच्या गाडी चालकाने कृष्णा केरे याला लायसन नसताना गाडी चालवण्यास दिली. कृष्णा केरे हा मद्यपान करुन गाडी चालवत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी मद्यपान करुन गाडी चालवत अपघाताला कारणीभूत ठरलेल्या दोन जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+