Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप सुसाट; सध्याच्या घडीला कोणता पक्ष किती जागांवर आघाडीवर? वाचा

Chhatrapati Sambhaji nagar Election Result Live : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपने सुरुवातीच्या फेऱ्यांतच मोठे यश मिळवले आहे. मात्र, शहरात राजकीय निकालांपेक्षा मतमोजणी केंद्रावर झालेल्या राड्याचीच चर्चा अधिक होत आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश करण्यावरून झालेल्या वादात पोलिसांनी लाठीमार केला असून, यात शिवसेनेचे माजी महापौर विकास जैन यांच्यासह अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

Chhatrapati Sambhaji nagar Election Result

निकाल अपडेट: भाजप १२ जागांसह आघाडीवर

  • सकाळी ११:१५ वाजेपर्यंत हाती आलेल्या अधिकृत कलानुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने १२ जागांवर भक्कम आघाडी घेतली आहे.
  • महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) ६ जागांवर पुढे आहे.
  • उद्धव ठाकरेंची शिवसेना ५ जागांवर, तर एमआयएम (AIMIM) देखील ५ जागांवर जोरदार लढत देत आहे. शहरात पुन्हा एकदा भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

मतमोजणी केंद्रावर हायव्होल्टेज ड्रामा

निकाल जाहीर होत असतानाच, मतमोजणी केंद्राच्या आत शिरण्यावरून पोलीस आणि शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांनी लाठीमार केला.

माजी महापौर जखमी

या लाठीमारात शिवसेनेचे माजी महापौर विकास जैन यांच्या पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट आक्रमक झाल्या असून, "दोषी पोलिसांवर कारवाई झाल्याशिवाय मतमोजणी पुढे सरकू देणार नाही," असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. यामुळे काही काळ मतमोजणी प्रक्रियेत तणाव निर्माण झाला होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+