Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Chhagan Bhujbal : भुजबळांनीच दिली प्रकृतीविषयी माहिती; म्हणाले- चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही

Chhagan Bhujbal : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची बुधवारी गुरुवारी प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीविषयी खुद्द त्यांनी अपडेट दिली आहे. मी काल बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल झालो आहे. उपचार सुरू असून आता माझी प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही.

Chhagan Bhujbal

मिळालेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यादरम्यान त्या ठिकाणी गेले होते. मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्याहून मुंबईत आणण्यात आलं. मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. डॉक्टरांच्या देखरेखीखाली छगन भुजबळ यांच्यावर उपचार सुरु आहेत.

एअरलिफ्ट करुन मुंबईत आणण्यात आलं होतं

छगन भुजबळ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा असल्याने त्यांच्यासह पुणे दौऱ्यावर गेले होते. आज सकाळपासूनच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्यांना ताप आला आणि घशाचाही त्रास जाणवू लागला. पुण्यातील डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना पुण्यातून एअरलिफ्ट करुन मुंबईत आणण्यात आलं. बॉम्बे रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी भुजबळ यांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याने मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+