CA Final Result! सीएचा रिझर्ट आज जाहीर होणार, कसा पहायचा निकाल, वाचा ए टू झेड माहिती

CA Final Result 2024: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया (ICAI) आज CA फायनल परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करणार आहे. निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. तसेच विद्यार्थ्याना ऑनलाईन या निकालाचा आढावा घेता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी ICAI च्या icaiexam.icai.org, caresults.icai.org किंवा icai.nic.in या अधिकृत संकेतस्थळांना भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

CA Final Result

कधी झाली होती परीक्षा

सीएची परीक्षा 3 नोव्हेंबर 2024 पासून ते 14 नोव्हेंबर 2024 पर्यंत घेतली गेली होती. परीक्षा 2 ग्रुपमध्ये आयोजित करण्यात आली होती. ग्रुप 1 साठीची परीक्षा 3, 5 आणि 7 नोव्हेंबरला झाली होती. ग्रुप 2 साठीची परीक्षा 9, 11 आणि 14 नोव्हेंबरला झाली होती. प्रत्येक पेपर 3 तासांचा होता. सीए अंतिम परीक्षेत यशस्वी होण्यासाठी, उमेदवाराने प्रत्येक विभागात किमान ४० टक्के गुण आणि एकूण ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. या परीक्षेचे स्कोअरकार्ड गुरुवारी सांयकाळपर्यंत प्रकाशित केले जाऊ शकतात असा अंदाज आहे.

कसा पाहायचा निकाल

ICAI ने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, CA नोव्हेंबर २०२४ परीक्षेचा निकाल २६ डिसेंबर रोजी जाहीर केला जाऊ शकतो. उमेदवार संस्थेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन जारी केलेली नोटीस तपासू शकतात.


स्टेप बाय स्टेप

१. पहिल्यांदा ICAI च्या icai.org च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२. त्यानंतर होम पेजवर दिलेल्या Important Announcements सेक्शनवर जा.
३. येथे सीए नोव्हेंबर २०२४ अंतिम परीक्षेचा निकाल या लिंकवर क्लिक करा.
४. नोंदणी क्रमांक आणि रोल नंबर टाका आणि सबमिट करा.
५. तुमच्या स्क्रीनवर स्कोअरकार्ड दिसेल.
६. स्कोअरकार्ड तपासून आणि प्रिंट काढा.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+