ठाणे,मीरा-भाईंदरमधील अनधिकृत पब,बारच्या अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा- मुख्यमंत्री शिंदे
मुंबई : ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब्ज, बारवर कठोर कारवाई करावी. तसेच शहरातील अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवून ती नष्ट करण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही शहरांचे महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांना दिले आहेत.

तर पुण्यातील एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलं ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आला होता त्यानंतर दुस-या दिवशी ही हॉटेलच्या वॉशरुममध्ये ड्रग्सचं सेवन केल्याचा व्हिडीओ व्हायरला झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा एकच खळबळ उडाली. या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांना तेथील अमली पदार्थांशी संबंधित अनधिकृत बांधकामे बुलडोझर लावून नष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे शहरामध्ये या संदर्भात व्यापक कारवाया करण्यात आल्या. आता तशाच पद्धतीने ठाणे शहर आणि मीरा-भाईंदर शहरातील अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामे ही बुलडोझर लावून नष्ट करण्यात यावीत, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.
अमली पदार्थामुळे तरुणाईचे मोठे नुकसान होत आहे. हा विळखा तातडीने रोखणे महत्त्वाचे आहे. यासाठी अत्यंत कडक उपाय योजण्यात यावेत. अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरु करावी. शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
पुणे पोलिस आयुक्तांना कडक करावाईचे निर्देश
पुणे शहराला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. तसेच अंमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा,असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी दिले आहेत.अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.पुणे शहरात अंमली पदार्थ विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना निर्देश दिले.
पुणे शहरातील बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी.अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध नव्याने कठोर कारवाई सुरु करावी. यासंदर्भातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवून कठोर कारवाई करावी.पुणे शहराला अंमली पदार्थमुक्त शहर करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत,असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.












Click it and Unblock the Notifications