Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

न्यू इयर सेलिब्रेशन! 5 ते 10 हजारांत पर्यटनासाठी महाराष्ट्रातील टॉप ठिकाणे; बघा स्वस्तात मस्ट लिस्ट

Budget travel destinations maharashtra under 5 to 10 thousnad new year 2026 celebration guide : २०२५ ला निरोप देऊन २०२६ चे स्वागत करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अनेकजण या काळात फिरण्याचे नियोजन करतात, पण बजेटचे टेन्शन असते. जर तुम्हालाही खिशला जास्त कात्री न लावता फिरण्याचा आनंद घ्यायचा असेल, तर टेन्शन घेऊ नका! महाराष्ट्रात अशी अनेक बजेट-फ्रेंडली (Budget Friendly) ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही ५००० रुपयांच्या आत राहणे, खाणे आणि फिरणे उरकून नवीन वर्षाचा आनंद घेऊ शकता. बीचेसपासून ते थंड हवेच्या ठिकाणांपर्यंत, पाहा तुमच्यासाठी खास लिस्ट.

Budget travel destinations maharashtra

१. महाराष्ट्रातील 'बेस्ट बीचेस' (Beach Destinations)

अलिबाग

मुंबई-पुण्याजवळचे हे 'मिनी गोवा' म्हणून ओळखले जाणारे ठिकाण सर्वात लोकप्रिय आहे. रेवदंडा किंवा नागाव बीचवर तुम्ही 'बीच कॅम्पिंग' करू शकता. एका रात्रीच्या कॅम्पिंगचा खर्च साधारण १,५०० ते २,५०० रुपये असतो, ज्यामध्ये जेवण आणि डीजे नाईटचा समावेश असतो.

दिवेआगार आणि श्रीवर्धन

शांतता हवी असेल तर कोकणातील या समुद्रकिनाऱ्यांची निवड करा. येथील घरगुती खानावळी (Homestays) अतिशय स्वस्त आणि चविष्ट मालवणी जेवण देतात.

तारकल्ली (कोकणातील स्थळ)

जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्सची आवड असेल, तर मालवणमधील तारकर्ली बीच बेस्ट आहे. स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगचा अनुभव तुम्ही बजेटमध्ये घेऊ शकता.

२. थंड हवेची ठिकाणे (Affordable Hill Stations)

माथेरान

वाहनांना बंदी असलेले आशियातील एकमेव ठिकाण! नेरळवरून टॉय ट्रेन किंवा चालत जाऊन तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता. येथील छोटे लॉज किंवा कॉटेज स्वस्त दरात उपलब्ध होतात.

भंडारदरा

अहमदनगर जिल्ह्यातील हे ठिकाण 'कॅम्पिंग'साठी प्रसिद्ध आहे. आर्थर लेकच्या काठी तंबूत राहून रात्रीच्या चांदण्यांच्या प्रकाशात तुम्ही नवीन वर्षाचे स्वागत करू शकता.

महाबळेश्वर आणि पाचगणी

महाबळेश्वर आणि पाचगणी येथील एमटीडीसी (MTDC) रिसॉर्ट्स किंवा बजेट हॉटेल्स निवडून तुम्ही ५००० रुपयांच्या आत ट्रिप प्लॅन करू शकता. स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेत 'विंटर व्हाईब्स' एन्जॉय करा.

३. ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणे

लोणावळा आणि खंडाळा: ट्रेकिंगची आवड असेल तर लोहगड किंवा राजमाची किल्ला सर करा. लोणावळ्यात राहण्याचा खर्च थोडा जास्त असू शकतो, पण जवळील आश्रमात किंवा छोट्या हॉटेल्समध्ये तुम्ही स्वस्त पर्याय शोधू शकता.

इगतपुरी

नाशिक जवळील हे ठिकाण विपश्यना केंद्र आणि धबधब्यांसाठी ओळखले जाते. येथे रेल्वेने जाणे अतिशय स्वस्त पडते.

बजेट ट्रिपसाठी काही खास टिप्स

  • १. पर्यटनस्थळ आधीच निवडा व सर्व बुकिंग आधीच करणे उत्तम, कारण ३१ डिसेंबरला दर वाढतात, त्यामुळे शक्य असल्यास आताच बुकिंग करा.
  • २. एसटी किंवा रेल्वेचा वापर करा, स्वतःच्या कारपेक्षा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास केल्यास भरपूर पैसे वाचतात.
  • ३. होमस्टे निवडा, मोठ्या हॉटेल्सपेक्षा स्थानिक लोकांच्या घरी राहणे स्वस्त आणि सुरक्षित असते.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+