BMC Election Survey: मुंबई कुणाची? सर्व्हेचे धक्कादायक निकाल; ठाकरे की महायुती, कोणाचं पारडं जड वाचा
Bmc election survey 2026 : मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यापूर्वी 'एस्केंडिया स्ट्रॅटेजीज एलएलपी'ने केलेल्या ताज्या सर्व्हेमध्ये मुंबईकरांचा कल समोर आला असून, याचे निकाल राजकीय पक्षांची झोप उडवणारे आहेत. शिवसेना फुटीनंतर होणाऱ्या या पहिल्याच महापालिका निवडणुकीत पक्षापेक्षा 'नगरसेवकाचे काम' हाच सर्वात मोठा फॅक्टर ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काय सांगतोय सर्व्हे? (प्रमुख ठळक मुद्दे)
१. नगरसेवकाचे काम की पक्षाचे चिन्ह?
वनइंडियाने आपल्या वृत्तात सर्वेक्षणाचा अंदाज दिला, त्यानुसार, ४०% ते ५४% मतदारांनी स्पष्ट केले आहे की, ते पक्षाचे चिन्ह किंवा नेत्याचा चेहरा पाहून नव्हे, तर नगरसेवकाने प्रभागात केलेल्या कामाच्या आधारावर मतदान करतील. विशेष म्हणजे, ३६ ते ४५ वयोगटातील ५४% लोकांनी कामालाच प्राथमिकता दिली आहे.
२. ठाकरे ब्रदर्स (UBT-MNS) की महायुती?
मराठी मतांचे विभाजन यंदाही कायम असल्याचे दिसत आहे. मराठी मतदारांपैकी ४४% कल शिवसेना (UBT) आणि मनसेकडे आहे, तर ४२% कल भाजप-शिवसेना (शिंदे) महायुतीकडे आहे. महिला मतदारांमध्ये मात्र महायुतीचे पारडं जड असून ५०% महिलांचा पाठिंबा सत्ताधाऱ्यांकडे दिसत आहे.
३. मुस्लिम आणि अमराठी मतांचे गणित:
- मुस्लिम मतदार: ४१% मतदार काँग्रेस प्लस आघाडीच्या बाजूने उभे आहेत.
- गुजराती आणि उत्तर भारतीय: भाजप-शिंदे युतीला या गटातून ५३% पर्यंत मोठा पाठिंबा मिळण्याचा अंदाज आहे.
६० % मतदार अजूनही संभ्रमात!
या सर्व्हेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अजूनही ६०% मतदारांनी कोणाला मतदान करायचे हे ठरवलेले नाही. यामध्ये महिला (६९%) आणि मराठी माणूस (५५%) यांचे प्रमाण मोठे आहे. हा 'सायलेंट वोटर' ज्या बाजूने झुकणार, त्या पक्षाची सत्ता मुंबईवर येईल.
३२ जागांवर थेट 'काटे की टक्कर'
मुंबईतील २२७ पैकी ३२ जागा अशा आहेत जिथे काँग्रेस किंवा वंचितने उमेदवार दिलेले नाहीत. या जागांवर महायुती विरुद्ध ठाकरे ब्रदर्स (UBT+MNS) असा थेट सामना होणार आहे. मतांचे विभाजन टाळण्यासाठी ही रणनीती महत्त्वाची ठरणार आहे.
तरुणांमध्ये नाराजी, वृद्धांमध्ये समाधान?
१८ ते २५ वयोगटातील १३% युवा मतदार आपल्या नगरसेवकांच्या कामगिरीवर 'अतिशय असंतुष्ट' आहेत. याउलट ४६ ते ६० वयोगटातील नागरिक आपल्या नगरसेवकांच्या कामावर सर्वाधिक समाधानी असल्याचे सर्व्हेत म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications