BMC Election 2026: मुंबईच्या राजकारणात 'ऑपरेशन मशाल'! शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात?
BMC Election 2026-Eknath Shinde vs Uddhav Thackeray : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निकालानंतर सत्तेचा पेच सुटण्याऐवजी अधिकच गडद झाला आहे. भाजप-शिंदे युतीला काठावरचे बहुमत मिळाले असले, तरी पडद्यामागे सुरू असलेल्या गुप्त हालचालींमुळे मुंबईचा पुढचा महापौर कोणाचा? यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच शिंदे गटाचे काही नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची खळबळजनक माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाचा 'सायलेंट' गेम: शिंदे गटाचे नगरसेवक संपर्कात?
'द न्यू इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, शिंदे गटाच्या २९ नगरसेवकांपैकी काही नगरसेवकांनी मातोश्रीवरील उद्धव ठाकरेंच्या अत्यंत विश्वासू व्यक्तींशी संपर्क साधला आहे. "आमच्या मनात उद्धवजी आणि आदित्यजींबद्दल कोणतेही वैर नाही," असा निरोप या नगरसेवकांनी पाठवल्याचे समजते. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी "देवाच्या मनात असेल तर मुंबईचा महापौर शिवसेनेचाच (UBT) होईल," असे सूचक वक्तव्य करून सस्पेन्स वाढवला आहे.
शिंदेंची 'फिल्डिंग': २९ नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये झेपावले
नगरसेवक फुटण्याची कुणकुण लागताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पावले उचलली आहेत. सध्या देवेंद्र फडणवीस दाव्होस येथे आर्थिक परिषदेसाठी गेले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी शिंदेंनी आपल्या सर्व २९ नगरसेवकांना वांद्रे येथील 'ताज लँड्स एंड' या पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले आहे. सत्तास्थापनेचा पेच सुटेपर्यंत हे सर्व नगरसेवक कडक सुरक्षेत आणि नेत्यांच्या निगराणीखाली तिथेच राहणार आहेत.
महापौर पदासाठी रस्सीखेच: शिंदेंचा प्रस्ताव!
भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, ११४ हा बहुमताचा 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी त्यांना शिंदे गटाच्या २५ ते २९ नगरसेवकांची अत्यंत गरज आहे. हीच मजबुरी ओळखून एकनाथ शिंदे यांनी भाजपसमोर अटी ठेवल्याचे समजते. सुरुवातीची अडीच वर्षे किंवा समान कालावधीसाठी शिवसेनेचा (शिंदे गट) महापौर असावा. स्थायी समिती आणि इतर महत्त्वाच्या वैधानिक समित्यांमध्ये शिवसेनेला योग्य प्रतिनिधित्व मिळावे.
काय होऊ शकते राजकीय समीकरण?
जर शिंदे गटातील काही नगरसेवकांनी ऐनवेळी मतदानाला दांडी मारली किंवा ठाकरे गटाच्या बाजूने कौल दिला, तर भाजपचा महापौर बनवण्याचे स्वप्न भंगू शकते. दुसरीकडे, भाजपने शिंदेंची महापौर पदाची मागणी अमान्य केल्यास युतीमध्ये वितुष्ट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई पालिकेचा रणांगण आता 'मातोश्री', 'वर्षा' आणि 'ताज हॉटेल' या तीन केंद्रांभोवती फिरत आहे. देवेंद्र फडणवीस परदेशातून परतल्यानंतरच या गोंधळावर अधिकृत पडदा पडण्याची चिन्हे आहेत.
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस










Click it and Unblock the Notifications