Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमध्ये बंडाचा भडका! तिकीट कापल्याने इच्छुकांचा राडा; काळं फासलं, घेराव

Bjp rebel protest chhatrapati sambhajinagar ticket-denial : नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या गोटात मात्र मोठा भूकंप झाला आहे. आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीची घोषणा होताच, तिकीट न मिळाल्याने संतापलेल्या भाजपच्या इच्छुकांनी आणि त्यांच्या समर्थकांनी शहरात जोरदार राडा केला. 'निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना संधी दिली' असा आरोप करत कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर घोषणाबाजी केली.

Bjp rebel protest chhatrapati sambhajinagar

नेमकं प्रकरण काय?

भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून उमेदवारांची संभाव्य यादी किंवा काही नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा पसरली. यामध्ये अनेक वर्ष पक्षाचे काम करणाऱ्या काही ज्येष्ठ इच्छुकांची नावे डावलून नव्या चेहऱ्यांना किंवा नुकत्याच पक्षात आलेल्या नेत्यांना झुकते माप देण्यात आल्याचे समजताच असंतोष उफाळून आला.

भाजपमधील बंडाचा भडका: प्रमुख घडामोडी

नेत्यांच्या गाड्यांना घेराव

उमेदवारीवरून सलग दुसऱ्या दिवशीही तणाव कायम असून, संतप्त कार्यकर्त्यांनी भाजपचे दिग्गज नेते भागवत कराड आणि अतुल सावे यांच्या गाड्या अडवून त्यांना घेराव घातला.

नेत्यांचे फोटो फाडले

कार्यकर्त्यांमधील संताप इतका अनावर झाला होता की, त्यांनी घटनास्थळीच सावे आणि कराड यांचे फोटो फाडून आपला निषेध नोंदवला.

आत्मदहनाचा प्रयत्न

तिकीट नाकारल्यामुळे हताश झालेल्या एका इच्छुक उमेदवाराने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

घराणेशाही आणि पीएवर मेहेरबानी

अतुल सावे यांनी स्वतःच्या स्वीय सहायकाला आणि जवळच्या नातेवाईकांना उमेदवारी मिळवून दिल्याचा गंभीर आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. "पक्षासाठी झटणाऱ्यांना सोडून पीएला तिकीट का?" असा सवाल विचारण्यात येत आहे.

जातीयवादाचे आरोप

भागवत कराड यांनी केवळ एकाच समाजाच्या लोकांना प्राधान्य दिल्याची भावना व्यक्त करत कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर पक्षपातीपणाचे आरोप केले.

सर्वेक्षणाचे खुले आव्हान

"भाजप नेत्यांनी आत्ताच्या आत्ता उमेदवारीचा सर्वे सादर करावा. जर त्या सर्वेत माझं नाव नसेल, तर मी आयुष्यभर त्यांची गुलामी करेन," असे खुले आव्हान एका संतप्त इच्छुक उमेदवाराने दिले आहे.

शिवीगाळ आणि घोषणाबाजी

निषेध व्यक्त करताना कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांचा एकेरी उल्लेख करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला.

गाडीला काळं फासलं

भागवत कराड यांची गाडी अडवून कार्यकर्त्यांनी त्यावर काळं फासलं. या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर होता.

पक्षावर मालकी हक्कावरून टीका

"भाजप हा कोणाच्या बापाचा पक्ष नाही," अशा तिखट शब्दांत कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत पक्षातील हुकूमशाही प्रवृत्तीवर प्रहार केला.

१. भाजप कार्यालयावर धडक

इच्छुक संतप्त कार्यकर्त्यांनी शहरातील भाजप कार्यालयावर धडक दिली आणि जोरदार घोषणाबाजी केली. काही ठिकाणी फलकांवरील नेत्यांच्या फोटोंना काळं फासण्याचाही प्रयत्न झाला.

२. राजीनाम्यांचे सत्र

तिकीट न मिळालेल्या एका बड्या नेत्याने आपल्या समर्थकांसह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. "पक्षाने रक्ताचं पाणी केलेल्या कार्यकर्त्याचा अपमान केला आहे," अशी भावना या नेत्याने व्यक्त केली.

३. इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन, स्वबळाचा नारा

अनेक इच्छुकांनी आता 'स्वबळाचा' किंवा 'अपक्ष' लढण्याचा इशारा दिला असून, आज दुपारी शहरात ठिकठिकाणी त्यांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन केले.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त

राड्याची माहिती मिळताच पोलिसांनी भाजप कार्यालय आणि संबंधित नेत्यांच्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+