Accident News: भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलाने दुचाकीस्वाराला चिरडले; ऑन द स्पॉट गेला एकाचा जीव!
BJP MLA Suresh Dhas son accident news : बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाने कार चालवताना एका दुचाकीस्वाराला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याने कार चालवत असताना एका दुचाकीस्वाराला धडक दिली. हा अपघात अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाट्याजवळ घडली. यात नितीश शेळके या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. सुपा पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार धस यांचा मुलगा सागर धस सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमाराला अहिल्यानगर-पुणे महामार्गावरून प्रवास करत होता. दुचाकीस्वार जातेगाव फाट्याकडून येत असताना सागरच्या कारनं त्याला जोरदार धडक दिली. याप्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.
पारनेरच्या जातेगाव फाट्यावर अपघात!
पारनेरच्या जातेगाव घाट फाट्यावर हा अपघात झाला असून, यात नितीन शेळके (वय 34, पळवे खुर्द, ता. पारनेर) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. आष्टी मतदारसंघाचे भाजपचे (BJP) आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर याच्याकडील चारचारी वाहनाने हा अपघात झाला.
कसा झाला अपघात?
दुचाकीस्वार जातेगाव फाट्याकडून पारनेरकडे येत असताना, सागर धस याच्या वाहनाने मागून धडक जोराची धडक बसली. अपघात झाल्यानंतर त्याची माहिती सुपा पोलिसांना कळवण्यात आली. यानंतर जखमी दुचाकीस्वाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता.
कोण आहेत आमदार सुरेश धस?
बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे सुरेश धस हे आहेत. आष्टी मतदारसंघ हा सुरेश अण्णा धस यांचा बालेकिल्लाच समजला जातो. कारण, गेल्या कित्येक वर्षांपासून ते या मतदारसंघात निवडून येत आहेत. विशेषत: संतोष देशमुख हत्या प्रकरणाला विधानसभेत लावून धरण्याचे काम त्यांनी केले. तसेच त्यांनी ज्या पद्धतीने त्यांची विधानसभेत भूमिका मांडली, तेव्हापासून ते महाराष्ट्रात सर्वपरिचित झालेले आहेत.












Click it and Unblock the Notifications