गोपिचंद पडळकरांचे मंत्रिपदाचे स्वप्न भंगले, फडणवीसांचे विश्वासू म्हणून होती मोठी अपेक्षा
Gopichand Padalkar Biography : घटना किंवा स्टेटमेंट कोणत्याही विरोधकाचं असो, त्यावर गोपिचंद पडळकरांचा प्रतिवाद ठरलेला असतो. गेल्या पाच-दहा वर्षांपासून गोपिचंद पडळकर हे महाराष्ट्राच एक चर्चेतलं नाव झालंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवरील टीका असो की राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्याशी रंगलेला कलगीतुरा असो... या ना त्या कारणाने पडळकर प्रसारमाध्यमांमध्ये कायम असतात.
वंचित बहुजन आघाडीतून भाजपात आलेल्या हा नेता सध्या भाजपची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखला जातो. अभिनेता ते नेता असा त्यांचा जिवनप्रवास आहे. त्यांना मंत्रिपद मिळणार अशी चर्चा रगंली होती. परंतु, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. त्यांचे मंत्री होण्याचे स्वप्न अर्धवट राहिले.
पडळकर धनगर समाजाचे नेते
गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्या पार्टीशी वाद झल्यानंतर ते वंचित बहुजन आघाडीते गेले होते. मात्र तेथे जास्त रमले नाहीत. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा भाजपमध्ये आले. विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकिटावर लढली होती, मात्र बारामतीत त्यांचा अजित पवारांकडून मोठ्या फरकाने पराभव झाला होता. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. परंतु भाजपने त्यांना विधानपरिषदेला संधी दिली.

बारावीपर्यंतच झाले शिक्षण
सांगलीमधील आटपाटी तालुक्यातील पडळकरवाडी हे गोपीचंद पडळकर यांचं गाव. त्यांचे शिक्षण फक्त 12 वीपर्यंतच झालं आहे. सुरुवातीला समाजकार्य व त्यानंतर ते राजकारणात आले. धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षातून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली होती. पडळकरांनी आतापर्यंत एकदा जिल्हा परिषद, तीन वेळा विधानसभा आणि एकदा लोकसभा निवडणूक लढवली आहे. मात्र, पाच वेळा त्यांना पराभूत व्हावं लागलं आहे. आता त्यांना भाजपकडून विधानपरिषदेवर संधी देण्यात आली आहे.
पडळकर आणि वाद
पडळकरांचं वक्तव्य आणि वाद हे समिकरणच झालं आहे. शरद पवारांवर ते विखारी टिका करतात. गेल्या आठवड्यातच त्यांनी 100 शकुनी मेल्यावर शरद पवार जन्माला आले असं म्हटलं होतं. त्यापूर्वी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, असं वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केलं होतं. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरूनही पडळकरांनी शरद पवारांवर टीका केली होती. त्यांच्या वक्तव्यावरून अनेकदा वाद झाले आहेत.
पडळकरांचा चित्रपटाशी संबंध
एकच छंद गोपिचंद, ही त्यांच्याविषयीची त्यांच्या कार्यकर्त्यांची घोषणा चांगलीच गाजली होती. पडळकर हे नुसते राजकीय नेते नाहीत, तर त्यांचा चित्रपटसृष्टीशीही संबंध आहे. ते लेखक आणि सिने निर्मातेही आहेत. त्यांनी सिनेमाचं लेखन करतानाच अभिनयही केला आहे. 2019 मध्ये त्यांनी 'धुमस' या चित्रपटाची निर्मिती केली होती. यापुढेही चित्रपट करण्याचा त्यांचा मानस आहे. राजकारणातून वेळ काढून ते आपली आवडही जोपासतात. यावेळी ते पहिल्यांदाच मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.












Click it and Unblock the Notifications