Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Bhandara Blast : भंडाऱ्यात आयुध निर्माण कंपनीत भीषण स्फोट! 5 जण ठार 7 ते 8 जखमी, 5 किमीपर्यंत आवाज

Bhandara Blast : भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. यात पाच लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर पाच ते सात लोक जखमी असल्याची माहिती आहे. कंपनीमध्ये काम करत असताना सकाळी 11 वाजेच्या सुमारास हा स्पोट झाला आहे.

या स्फोटाचा आवाज जवळपास पाच किलोमीटर पर्यंत नागरिकांना ऐकू आला आहे. त्यामुळे या स्फोटाची तीव्रता किती भयानक असेल ते यावरून कल्पना करू शकतो. या कंपनीत दारू गोळा निर्मिती केली जात होती. घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब कार्यरत असून पोलिसही या घटनेच्या अनुशंगाने खबरदारी बाळगत आहे.

Bhandara Blast

...अन् एकच धावपळ

भंडाऱ्यातील स्फोटके तयार करण्यात येणाऱ्या कारखान्यात झालेल्या स्फोटाची छायाचित्रेही समोर आली आहे. यासह दुरवरुन काढलेले व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. त्यात शस्त्रे बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जड साहित्याचे तुकडे आजूबाजूला विखुरलेले दिसत आहेत. एक रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचली असून जखमींना मदत केली जात आहे. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, परिसरात घबराट पसरली आणि लोक सैरावैरा धावू लागले.

पाच किमीपर्यंत स्फोटाचा आवाज, घटनास्थळी मोठी गर्दी

भंडाऱ्यात 24 जानेवारीला सकाळी 11 वाजता दारुगोळा बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट झाला. त्यावेळी जवळपास पाच किलोमीटरपर्यंत स्फोटाचा मोठा आवाज ऐकू आला. तर आजूबाजूच्या परिसरात हादरे बसले. या घटनेने नागरिकांत खळबळ माजली. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर अनेकांनी कारखान्याकडे धाव घेतली. दरम्यान आता घटनास्थळी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत, आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्नही सुरु आहेत. मृतांच्यासंदर्भात अद्याप तपशील समजू शकलेला नाही. या घटनेत सात ते आठ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+