Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कराड- गित्ते गँगची धुमश्चक्री; महादेव गित्तेच्या पत्नीचा गंभीर आरोप, संतोष देशमुख प्रकरणाला नवे वळण

संतोष देशमुख हत्या प्रकरणात जेलमध्ये असलेल्या कराड गँगबाबत रोज नवी अपडेट येते आहे. काही दिवसांपूर्वी जेलमध्ये असलेल्या कराड व गित्ते गँगमध्ये धुमश्चक्री झाली होती. या हाणामारीनंतर जेल प्रशासनाबाबत चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी महादेव गित्ते याची पत्नी मीरा गित्ते यांनी जेलमधील प्रकाराबाबत एक मोठा आरोप केला.

Karad- Gitte gang clash

नेमकं काय घडलं होतं?

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना ३१ मार्चला तुरुंगात मारहाण झाल्याची चर्चा झाली होती. बापू आंधळे हत्या प्रकरणात तुरुंगात असलेले महादेव गित्ते आणि अक्षय आठवले या दोन आरोपींनी वाल्मिक कराड आणि घुलेला मारहाण केल्याचा दावा केला जात होता. त्यानंतर महादेव गित्ते आणि अक्षय आठवले या दोघांनाही बीड कारागृहातून दुसऱ्या कारागृहात हलवण्यात आलं. यादरम्यान महादेव गित्ते याने माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर सांगितलं की, वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन आम्हाला मारहाण झाली. त्यानंतर त्याची पत्नी मिरा गित्तेनेही गंभीर आरोप केले.

मीरा गित्ते यांचे आरोप काय?

महादेव गित्ते व अक्षय आठवले यांना दुसऱ्या तुरुंगात हलविल्यानंतर महादेव गित्ते यांची पत्नी मिरा गित्ये यांनी या प्रकरणात वेगळाच संशय व्यक्त केला. जेलमध्ये वाल्मिक कराडला सुविधा पुरविण्यात महादेव गित्ते अडथळा ठरत असल्यानेच आपल्या पतीला दुसऱ्या जेलमध्ये पाठविल्याचा त्यांचा आरोप होता. याशिवाय त्यांनी आणखी एक गंभीर आरोप केला. त्या म्हणाल्या होत्या की, सुदर्शन घुले याने आपल्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिलीय. तुम्ही जेलमध्ये होता म्हणून वाचला. बाहेर असता तर तुम्हाला संतोष देशमुखपेक्षा वाईट हाल करुन मारले असते, असं सुदर्शन घुले आपल्या पतीला म्हणाल्याचा दावा मिरा गित्ते यांनी केला.

मीरा गित्तेने घेतली अधिक्षकांची भेट

जेलमधील मारहाण ही वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुनच झाली. तीन दिवसांपासून त्याची प्लॅनिंग सुरु होती. अगदी या मारहाणीत लाठ्या काठ्या देखील वापरल्या असल्याचा आरोप मिरा गित्ते यांनी केला. या प्रकरणात त्यांनी बीडच्या पोलिस अधीक्षकांचीही भेट घेतली. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज समोर आणल्यास सगळे काही समोर येईल असे त्यांचे म्हणणे होते. जेलमध्ये संतोष देशमुख यांचे मारेकरी आणि विलास गित्ते, रघु फड आणि सुदिप सोनवणे यांनी माझ्या पतीवर हल्ला केला असून या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी मी पाठपुरावा करणार असल्याचे मिरा गित्ते यांनी म्हटले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+