Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

माणुसकी मेली! बीड परळीत खुनी हल्ला; 'तो' विव्हळत होता अन् टोळके बेदम मारत होते देशमुख प्रकरणाची आठवण

Beed News Murderous attack on youth in Parli : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे संतोष गेशमुख हत्याकांडाने सारा महाराष्ट्र संतप्त असतानाच आता बीड जिल्ह्यातीलच परळीत एक धक्कादायक घटना घडली. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना असून दहा ते बारा जणांचे टोळके अपहरण करुन आणलेल्या एका तरुणाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बीडच्या परळीत ही गंभीर घटना घडली असून संतोष देशमुख यांचे जसे अपहरण आणि त्यांना अमानुष मारहाण झाली होती, अगदी तशाच प्रवृत्तीची आठवण या घटनेने झाली आहे.

Beed News Murderous attack on youth in Parli

यासंदर्भात एबीपी माझानेही वृत्त दिले. त्यानुसार, परळीतील शिवराज हनुमान दिवटे या तरुणाचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर शिवराज दिवटे यालाअमानुष मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्यात एक म्होरक्या आणि त्याचे साथीदारांचा समावेश आहे. या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियांवर फिरत असून यासंबंधीचे वृत्तही विविध माध्यमांनी दिले आहे.

Take a Poll

कशी आणि कुठे झाली मारहाण?

शिवराज मुंडे शुक्रवारी जलालपूर येथील अखंड हरिनाम सप्ताहातून घरी परतत होता, त्यावेळी परळीतील रिलायन्स पेट्रोल पंपावरुन शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास शिवराज दिवटे याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याला टोकवाडी गावातील रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात नेण्यात आले. तेथे टोळक्यांनी शिवराज दिवटे याला बेदम मारहाण केली.

मारहाणीचा व्हिडिओ झाला व्हायरल

संशयित आरोपींचा जवळपास आठ ते दहा - बारा जणांचा गट होता. त्यात शिवराज याला लाठ्या आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली जात होती. अगदी दंडाचा जोर लावून टोळके त्याला मारत होते. एकजण बेल्टच्या साह्याने प्रहार करत होता..यावेळी शिवराज जमीनीवर आडवा पडलेला होता. तेव्हा अनेकजण मोठ्या म्रगुरीने या असहाय तरुणाला अमानुष मारहाण करत असल्याचे व्हिडिओत दिसते.

पोलिसांकडून घटनेचा कसून तपास सुरु

दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच परळीत खळबळ उडाली आहे. या व्हिडिओच्या अनुशंगाने पोलिस कठोर पावले उचलत आहे. पोलिस अधिक्षक म्हणून नवनीत काॅवल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही मोठी घटना समोर आली आहे. आता या प्रकरणी गुन्हा दाखल करुन पोलिस कायदेशीर कारवाई करत असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा : Beed News khokya bhai : ऐन होळीत बीडमध्ये खळबळ! खोक्याचे घर जाळले, कुटुंबीयांना मारहाण झाल्याचा आरोप

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+