Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

स्वप्न भंगलं! पोलिस होण्याआधीच काळानं हिरावलं; एसटीच्या धडकेत सराव करणारे तिघे ठार, बीडमधील घटना

Beed Accident : बीड तालुक्यातील घोडका राजुरी गावाजवळ घडली घटना बीड बीड-परळी महामार्गावर बीड-परभणी एसटी बसने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तीन जणांना धडक दिली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.

बीडजवळ घोडका राजुरी येथे रविवारी 19 जानेवारी 2025 सकाळी ही घटना घडली. अपघातात ठार झालेले तिघेही घोडका राजुरी येथील आहेत. 19 जानेवारी 2025 रोजी पहाटे 6.30 वाजता बीड तालुक्यातील घोडका राजुरी गावाजवळील स्वराज्य हॉटेलच्या पुढे बीड ते परभणी रोडवर हा अपघात घडला.

Beed Accident

राज्य परिवहन महामंडळाची एस.टी. बस ( क्रमांक एम एच 14 बीड टी 1473 ) ही रोडवरुन जात होती. त्यावेळी पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तीन मुलांना जोरदार धडकली. तीन जणांपैकी दोन जण जागेवरच मृत झाले व एक मुलगा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालय बीड येथे मृत झाला.

बस पेटवण्याचा प्रयत्न

या अपघातानंतर संतप्त जमावाने राप बस पेटवण्याचा प्रयत्न केला असता बसचे तीन शीट जळाले. बस चालकाचे पुंडलिक देविदास मुसळे हे नाव आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृतांमध्ये सुबोध (बालू) बाबासाहेब मोरे (वय 20), विराट बब्रूवान घोडके (19) आणि ओम सुग्रीव घोडके (20) यांचा समावेश आहे.

घटनास्थळी पोलिसांची धाव

घटनेची माहिती कळताच या तरुणांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे. बसने धडक दिल्यामुळे गावातील संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बस पेटवून दिली.‌घटना स्थळी पोलीसांनी वेळीच पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली दरम्यान राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अनूजा दुसाने, यंत्र अभियंता धारणी कांडगिरे, विभागिय वाहतुक अधिकारी राजकुमार दिवटे, वाह.निरीक्षक बी. व्ही. बनसोडे यांनी भेट दिली आहे

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+