अक्षय शिंदेने स्वत:वर गोळी झाडून घेतली की त्याच्यावर गोळीबार झाला, नेमकं काय आहे प्रकरण?
Badlapur Case Accused Akshay Shinde : ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमधील शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर संताप व्यक्त केला गेला. आरोपीला फाशीची शिक्षा दिली जावी म्हणून लोक रस्त्यावर उतरले होते. अशातच सोमवारी सायंकाळी या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर गोळी झाडल्याची घटना पुढे आली आहे. यात त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. पण पोलिसांच्या ताफ्यातून स्वत:वर त्याने गोळी झाडून घेतली की त्याच्यावर गोळीबार झालाय, अशी चर्चा रंगली आहे. का महाराष्ट्रातही योगी स्टाईल घटना घडू लागल्या आहेत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर विरोधकांनी या घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

नेमका काय घडला प्रकार?
ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना अक्षय शिंदेंने पोलीसांची बंदूक हिसकावून स्वत:वर गोळी झाडली आहे. पोलिसांच्या बंदुकीने गोळी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तीन राऊंड फायर झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये अक्षय गंभीर जखमी झाला आहे. या वेळी अक्षयला वाचवण्यासाठी गेलेले पोलीस अधिकारी देखील जखमी झाले आहे. अक्षयची प्रकृती गंभीर आहे. हा एन्काऊंटर नसून आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. सध्या अक्षयची प्रकृती अतिशय गंभीर असून त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कोण आहे नराधम अक्षय शिंदे?
अक्षय शिंदेचे वय 24 वर्षे, अक्षयचे शिक्षण दहवीपर्यंत, अक्षय शिंदे बदलापूर येथील एका शाळेचा शिपाई, या आधी अक्षय एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता, एका कंत्राटामार्फत आदर्श शाळेत शिपाई म्हणून लागला, अक्षय,आई-वडील आणि त्याचा भाऊ आणि भावाची बायको असे त्याचे कुटुंब, अक्षयची तीन लग्न झाली होती मात्र तिनही बायका सोडून गेल्या होत्या, अक्षय कर्नाटकातील गुलबर्गा या गावातील, मात्र अक्षयचा जन्म बदलापूरमधील खरवई गावातला आहे.
आरोपीनं दिली होती कबुली
विशेष तपास पथकाने बदलापूरच्या एका शाळेतील दोन बालिकांवरील लैगिक अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे. शाळेचे कर्मचारी, डॉक्टर, फॉरेन्सिक अधिकारी आणि तहसील अधिकारी यांच्यासह 20 पेक्षा अधिक व्यक्तींच्या साक्षीचा सहभाग असून आरोपीने एका मुलीला मारहाण केल्याचे तिने सांगितले होते. प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा आरोपीने या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत सहभाग असल्याचे पोलीस चौकशीत, तसेच डॉक्टरांसमोरही मान्य केले होते.
विरोधकांना शंका, निकम म्हणाले चौकशी होईल
या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली असून राजकीय नेतेही या घटनेवर प्रतिक्रिया देत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या घटनेवर भाष्य करताना पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दुसरीकडे बदलापूर अत्याचार प्रकरणातील सरकारचे वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया देताना, याची न्यायालयीन चौकशी होईल, असे म्हटले आहे.
-
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस -
मनोरंजन विश्वावर शोककळा! अवघ्या 27व्या वर्षी प्रसिद्ध कलाकाराचा संशयास्पद मृत्यू -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
Horoscope Today March 12, 2026 Marathi : गुरुवार ठरणार प्रगतीचा दिवस; वाचा तुमच्या राशीत काय आहे खास -
IPL 2026 Schedule: आयपीएलचे 15 दिवसांचे वेळापत्रक समजून घ्या; पहिल्या सामना RCB Vs हैदराबाद










Click it and Unblock the Notifications