Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं, मला न्याय द्या; एन्काऊंटर झालेल्या अक्षय शिंदेच्या आईचा आरोप

Akshay Shinde Badlapur Encounter Case : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला असून त्यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. बदलापूर प्रकरणातील खरे आरोपी समोर येऊ नयेत म्हणून गृहमंत्र्यांनी पोलिसांना एन्काऊंटरचे आदेश दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अशातच मृत अक्षय शिंदेच्या आईची प्रतिक्रिया आता समोर आली आहे. आपला मुलगा रस्ता क्रॉस करतानाही हात पकडायचा, तो पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊच शकत नाही, माझ्या मुलाला पैसे देऊन मारून टाकलं आहे, असा आरोप देखील मृत अक्षय शिंदे यांच्या आईने केला आहे. त्या एका वृ्तवाहिणीशी बोलत होत्या.

माझ्या पोराला पैसे देऊन मारलं गेलं

अक्षय शिंदे याची आई म्हणाली की, मी पोरासोबत बोलले, मम्मी चार्जशीट आली नाही मला कधी सोडवणार? मी बोलले थांब जरा बघू आपण. त्याच्या हातात एक कागद दिला होता तो मला दाखवत होता, त्याला सांगितलं, मला वाचता नाही येत. पोराला पैसे देऊन मारून टाकलं, माझ्या पोराची भरपाई करून द्या. आता आम्हीपण तिथे येतो आम्हाला पण गोळ्या घाला, मरायला तयार आहोत. दिवाळीला एक फटाका वाजवायला घाबरतो तो असं काही करू शकत नाही. आम्हाला घरातून मारत बाहेर केलं असून आम्ही स्टेशनवर फिरत आहोत. माझ्या पोराची मी वाट पाहत आहे, तो असं काही करू शकत नाही मला माहित आहे.

Akshay Shinde s mother

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर

बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला पोलिस तळोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रान्चला घेऊन जात होते, त्यावेळी हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदेने पोलिस कॉन्स्टेबलची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांना लागली गोळी लागली. त्यानंतर एपीआय निलेश मोरे यांनी स्वसंरक्षणासाठी गोळी झाडली. यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी 6.30 च्या आसपास पोलिसांची टीम मुंब्रा बायपास जवळ आली. त्यावेळी ही घटना घडल्याची माहिती आहे.

अक्षय शिंदेवर तीन गोळ्या झाडल्या

पोलिसांनीही स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर तीन गोळ्या झाडल्या. पोलिसांच्या गोळीबारामुळं जखमी झालेल्या अक्षयला कळवा रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी अक्षय शिंदेला मृत घोषित केलं. जखमी झालेल्या एपीआय निलेश मोरेंवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+