Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

एनकाऊंटर झालेला बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे कोण होता? काठीवाला दादा म्हणून ओळखला जायचा

Badlapur School Girl Rape Case : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांची एनकाऊंटर झाल्याचं वृ्त्त पुढं येताच आता तो कोण होता, का त्याला अटक झाली, एनकाऊंटर का झाला हे प्रश्न विचारले जात आहे. काठीवाला दादा म्हणून ओळख असलेला अक्षय शिंदे याला दोन शालेय मुलीशी लैंगिक कृत्य केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली होती. हे सर्व प्रकरण आणि अक्षय शिंदे कोण होता हे आपण जाणून घेऊया..

बदलापूर येथील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींशी 13 ते 14 ऑगस्टदरम्यान लैंगिक कृत्य केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी अक्षय शिंदे या तरुणाला अटक झाली होती. दरम्यान या प्रकरणात मुलींच्या पालकांनी तक्रार देऊनही पोलिसांनी दखल घेतली नाही असा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी लोकांनी बदलापूर स्टेशनवर रेल्वे रुळ रोखून धरला होता तसेच आंदोलन केले होते. त्यानंतर या प्रकरणात वेगाने घडामोडी घडल्या होत्या.

Badlapur School Girl Rape Case

दरम्यान, बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा आज ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा बायपासवर पोलिसांच्या चकमकीत ठार झाल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कोण होता अक्षय शिंदे

बदलापुरातील चोवीस वर्षीय अक्षय शिंदे हा सफाई कामगार होता. तो एक ऑगस्ट रोजी एका सफाई कंपनीमार्फत शाळेत कंत्राटावर नोकरीला लागला होता. नव्यानेच नोकरीला लागलेल्या अक्षयला विद्यार्थिंनीना शौचालयास घेऊन जाण्याचीही जबाबदारी देण्यात आली होती. त्याला शाळेतील मुलं काठीवाला दादा म्हणून ओळखत होती.

काय आहे प्रकरण

13 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 च्या दरम्यान बदलापुरातील शाळेतील दोन लहान मुलींबरोबर दृष्कृत्य केल्याची घटना घडली होती. परिणामी त्यांना गुप्तांगात वेदना होऊ लागल्या. या मुलींनी यासंदर्भात त्यांच्या पालकांना कळवलं. पालकांनी तत्काळ वैद्यकीय तपासणी केल्याने हा प्रकार उजेडात आला. परंतु, वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरही या प्रकरणी कारवाई करण्यास पोलिसांकडून दिरंगाई झाल्याचा दावा करण्यात आला होता.

  • 16 ऑगस्टच्या रात्री या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला.
  • 17 ऑगस्ट रोजी अक्षय शिंदे या आरोपीला अटक करण्यात आली.
  • 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर न्यायलयीन प्रक्रीया सुरु होतीय
  • 20 ऑगस्ट - चार वर्षीय मुलींवर या नराधमाने अत्याचार केल्याचा अक्षयवर आरोप होता. या प्रकरणी गुन्हा दाखल होण्यास उशीर झाल्यानेही बदलापुरात 20 ऑगस्ट रोजी आंदोल आंदोलन पेटले होते.
  • 23 सप्टेंबरला पोलिस एनकाऊंटरमध्ये मृत्यू.
More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+