Breaking News: Badlapur School Girl Rape Case बदलापूर प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

Badlapur School Girl Rape Case : बदलापुर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आरोपीने पोलिसांची बंदूक घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत एक पोलीस अधिकारी ही जखमी झाले आहे.

अक्षय शिंदे हा गंभीर असल्याचं बोललं जात आहे. पोलिसांकडून अजून या बाबतीत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आरोपीने शाळेतील अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. सध्या पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. तळोजा कारागृहातून पोलीस त्याला बदलापूरला घेऊन येत असताना ही घटना घडल्याचं बोललं जातं आहे.

ट्रान्झिस्ट रिमांडसाठी नेताना ही घटना घडली असून अक्षय शिंदे याने पोलिसाची रिव्हाल्व्हर हातात घेतली व स्वतःवर गोळी झाडली. दरम्यान या घटनेत एक पोलिस जखमी झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांना वेळीच खबरदारी घेतली आहे. या घटनेत आरोपी अक्षय हा गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे.

Badlapur School Girl Rape Case Accused in Badlapur case shot himself

(ही बातमी अपडेट होत आहे...)

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+