Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Badlapur Encounter Posters बदलापूर्ण! देवेंद्र फडणवीसांच्या हाती पिस्तूल, मुंबईत पोस्टर्स कुणी लावले

Badlapur Encounter Posters: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या पोलिस चकमकीत मृत्यूवरून जोरदार राजकारण सुरू झाले आहे. बदलपूरच्या शाळेत दोन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या अक्षय शिंदेच्या मृत्यूवरून झालेल्या गदारोळात, मुंबईत सकाळी सर्वत्र पोस्टर पाहायला मिळाले आहे.

मुंबईत लागलेल्या पोस्टर्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, याला कारणही तसेच आहे हे पोस्टर्स वांद्रे आणि कला नगरसह मुंबईत अनेक ठिकाणी हे पोस्टर्स दिसत आहेत. कलानगर येथे युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान आहे आणि या पोस्टर्सवर देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे. हे पोस्टर अक्षय शिंदे याच्या एनकाऊंटरसंदर्भात आहे.

Badlapur Encounter Posters

पोस्टर्सवर लिहिले बदला पुरा..!

या पोस्टरच्या माध्यमातून पोलिसांची अक्षय शिंदेंचे एनकाऊंटर करुन बदलापूर येथे झालेल्या दोन मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात न्याय्य दिला आणि बदला पुर्ण केला असा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला जात आहे.

बदला पुरा..फडणवीसांच्या हातात बंदूक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात पिस्तूल असल्याचे पोस्टरवर दिसत असून त्यामुळे हे पोस्टर चर्चेत आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात एक पिस्तूल आहे आणि पोस्टरवर मोठ्या शब्दात लिहिले आहे, बदला पुरा... हे पोस्टर कोणी लावले? बॅनर्सवर कोणत्याही राजकीय पक्षाचे किंवा नेत्याचे नाव नसले तरी, प्रचारात देवेंदे फडणवीस हे रिव्हॉल्व्हरसह सज्ज असलेल्या योद्धा असल्याचे चित्र दाखवले जात आहे.

राजीनाम्याची मागणी

ऑगस्ट महिन्यात बदलापूर शाळेतील नर्सरी वर्गातील दोन विद्यार्थिनींचा सफाई कामगार अक्षय शिंदे याने लैंगिक छळ केल्याचा आरोप होत होता. या घटनेनंतर बदलापूरमधील संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून रेल्वे रोखून धरली. त्याचवेळी या घटनेवरून राजकीय पक्षांनी जोरदार राजकारण सुरू केले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली.

बदलापूर पोलिस एनकाऊंटरवर विरोधकांचा हल्लाबोल

दोन मुलींशी लैंगिक कृत्य केल्याचा आरोपी असलेला अक्षय शिंदेचे एनकाऊंटर झाल्यानंतर महाराष्ट्रातील महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचे राजकारण विरोधकांचे करत आहेत. उद्धव ठाकरे गटातील शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी चकमकीच्या पद्धतीवर टीका केली आणि सांगितले की या प्रकरणातील काही गहन मुद्दे लपविण्याचा प्रयत्न होत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+