बाबा सिद्दीकी हत्याकांड : मुख्य आरोपी हरीशला 28 ऑक्टोबरपर्यंत गुन्हे शाखेची कोठडी, अन्य आरोपींना..
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडातील 9 आरोपींची आज पोलिस कोठडी संपली होती. त्यामुळे त्या आरोपींना आज मुंबईतील एस्प्लानेड न्यायालयात हजर करण्यात आले.
या सुनावणीत न्यायालयाने आरोपी हरीशला 28 ऑक्टोबरपर्यंत मुंबई गुन्हे शाखेची तर उर्वरित आरोपींना 4 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने आरोपी शूटर गुरमेल सिंग, धर्मराज कश्यप, प्रवीण लोणकर यांची न्यायालयीन कोठडी वाढवली आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी खून खटल्यातील महत्त्वपूर्ण घडामोड समोर आलेली आहे. सर्व नऊ आरोपींना शनिवारी 26 ऑक्टोबर रोजी मुंबईतील एस्प्लेनेड कोर्टात पोलिस कोठडी संपल्यानंतर हजर करण्यात आले.
Baba Siddique murder case: All the 9 accused arrested in the case were produced before Esplanade court in Mumbai today after the end of their police custody. The court sent accused Harish to the custody of Mumbai Crime Branch till October 28 and the rest of the accused to police…
— ANI (@ANI) October 26, 2024
न्यायालयाने आरोपी हरीश कुमारला 28 ऑक्टोबरपर्यंत मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, तर उर्वरित आरोपींना 4 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हजर झालेल्यांमध्ये नेमबाज गुरमेल सिंग, धर्मराज कश्यप आणि प्रवीण लोणकर यांचा समावेश आहे. ज्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.
हे ही वाचा : बाबा सिद्दीकी हत्याकांडात पाकिस्तान-ऑस्ट्रेलियाचे कनेक्शन; पोलिस तपासातून धक्कादायक खुलासा!
12 ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकींची हत्या
वांद्रे पूर्व भागात त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकीच्या कार्यालयाबाहेर 12 ऑक्टोबर रोजी गोळ्या घालून बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती. या प्रकरणात जवळपास 11 आरोपींना अटक करण्यातल आलेले आहे. तर आज 9 आरोपींची कोठडी संपली होती. तर आज न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने कोठडीत वाढ केली आहे.












Click it and Unblock the Notifications