बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, उत्तर प्रदेशातून 2 आरोपींना घेतलं ताब्यात
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांना आणखी एक शस्त्र घटनास्थळी सापडल्याची माहिती आहे. आरोपींने पळून जाताना एक बॅग फेकून दिली होती. त्यामध्ये पिस्तूल असल्याची माहिती आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर हे पिस्तूल पोलिसांना सापडलं आहे. निर्मल नगर पोलिसांना हत्येत वापरलेले पिस्तूल सापडले आहे. त्याचवेळी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील बहराइचमधून आणखी 2 जणांना अटक केली आहे. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण 6 जणांना अटक केली असून त्यात 2 शूटर्सचा समावेश आहे.
मुंबई क्राइम ब्रँच आणि स्पेशल सेलच्या संयुक्त पथकाने मंगळवारी बहराईचमधील गंडारा भागात छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही बाबा सिद्दिकीच्या हत्येतील आरोपींसोबत भंगाराचा व्यवसाय करत होते. या दोन तरुणांकडून महत्त्वाचे सुगावा मिळेल, असा दावा मुंबई पोलिसांकडून केला जात आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते तथा माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येमागे बिश्नोई गॅंगचा हात असल्याचे समोर आले आहे.सलमान खान आणि दाऊदला मदत करणाऱ्यांना सोडणार नाही, असे म्हणत लॉरेन्स टोळीने हत्येची जबाबदारी घेतली.
सिद्दिकी यांना वाय-सुरक्षा मिळाली होती, मात्र घटनेच्या वेळी त्यांच्यासोबत एकही हवालदार नव्हता. रस्त्यावरील दिवे आणि सीसीटीव्हीही बंद करण्यात आले होते. शनिवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास वांद्रे येथील खेर नगर येथील आमदार पुत्र झिशान यांच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता.
Baba Siddiqui murder case | Mumbai Police has detained two people from Bahraich in Uttar Pradesh. One of the two people detained is Harish, who had a scrap shop in Pune where accused Dharmaraj and Shivprasad Gautam used to work. Harish had bought new mobile phones for Shivprasad…
— ANI (@ANI) October 15, 2024
मुंबईतील अल्पसंख्याक समाजातील बड्या नेत्यांमध्ये बाबा सिद्दीकी यांची गणना होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसचा राजीनामा दिला होता. मात्र, नंतर त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश केला. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकीही राजकारणात सक्रिय आहे.












Click it and Unblock the Notifications