बी प्लॅन ठरला! बहुमत मिळाले नाही तरीही महायुतीचीच असणार सत्ता, नेमका प्लॅन काय, वाचा सविस्तर
Maharashtra Assembly Election 2024 : उद्या लागणार्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. राज्याच्या राजकारणाचं भवितव्य ठरणार आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानंतर महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षांची रणनीती काय आहे? कोणती हालचाल सुरू आहेत?, याचा आढावा आपण घेऊया.
महायुतीची रणनीती
सर्वांत आधी महायुतीच्या हालचालींविषयी जाणून घेऊ. एक्झिट पोलचे निकाल पाहता, महायुतीने संभाव्य परिस्थितीसाठी प्लॅन बी तयार केलाय. बहुमत न मिळाल्यास छोट्या पक्षांना जवळ करण्याची रणनीती आखली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी अपक्षांशी संपर्क नसल्याचे सांगितले असले, तरी सूत्रांच्या माहितीनुसार, अपक्ष आणि बंडखोरांशी चर्चा सुरू असल्याचं समजतंय. भाजपकडून घटक पक्षांना सत्तेत वाटा देण्याची तयारी असल्याचंही बोललं जातंय. केंद्रात भाजपचं बळ असल्यामुळे ही योजना कशी प्रभावी ठरेल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेय.

ठाकरे गटाची खबरदारी
ठाकरे गटही या निकालांबाबत पूर्णपणे सावध आहे. उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पक्षाच्या उमेदवारांशी संवाद साधत, मतमोजणीसाठी काय काळजी घ्यावी, यावर मार्गदर्शन केलंय. टपाली मतं, EVM मतमोजणीसंदर्भात बारकावे आणि आवश्यक आक्षेपांची नोंद यावर चर्चा झालीय. उत्तर पश्चिम मुंबईतील लोकसभा निवडणुकीत झालेल्या प्रकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठाकरे गट विशेष खबरदारी घेत आहे. हे पाऊल पक्षाच्या रणनीतीसाठी निर्णायक ठरू शकतं.
महाविकास आघाडीचा आत्मविश्वास
दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही आपला आत्मविश्वास दाखवलाय. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी 'सत्ता स्थापनेसाठी कोणतीही अडचण येणार नाही,' असं ठामपणे सांगितलंय. तर विजय वडेट्टीवार यांनी निकालानंतर 12 तासांत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याचं आश्वासन दिलंय. वाढलेल्या मतदानाच्या टक्क्यामुळे महाविकास आघाडीला लाभ होईल, असा त्यांचा अंदाज आहे.
वाढलेल्या मतदानाचा परिणाम
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात तब्बल 66 टक्के मतदान झालंय, जे लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत जास्त आहे. हा वाढलेला मतदानाचा टक्का कोणाला फायदा देतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे. ग्रामीण भागातील वाढलेलं मतदान, शहरी भागातील अल्प सहभाग, आणि महिलांच्या मतदानाचा वाढलेला टक्का कोणत्या पक्षाला यश देणार, याकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष आहे.
अवघ्या काही तासांमध्ये महाराष्ट्राचं राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. महायुती, महाविकास आघाडी किंवा इतर कोणता गट सत्तेत येणार? उद्याच्या मतमोजणीवर सगळ्यांच्या नजरा आहेत. मतमोजणीचे ताज्या घडामोडी, निकाल आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पाहत रहा वन इंडिया मराठी. आम्ही तुम्हाला सर्वात आधी आणि अचूक माहिती देणार आहोत.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications