Axis My India exit poll result: महायुती की MVAला मिळेल महाराष्ट्राची सत्ता, विभागनिहाय कसा होईल विजय
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले आहे. तर निकाल आता 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. दरम्यान, बुधवारी काही एक्झिट पोलने महाराष्ट्रात पुन्हा महायुतीची सत्ता स्थापन होईल, असा दावा केला. अशातच आणखी एका संस्थेने महत्त्वाचा एक्झिट पोल जाहीर केल्याने यात देखील सत्तास्थापनेसंदर्भात मोठा दावा करण्यात आला आहे.
ॲक्सिस माय इंडिया यांनी महाराष्ट्र एक्झिट पोल जाहीर केला. यात महाराष्ट्रातील विविध भागात महायुतीला व महाविकास आघाडीला नेमक्या किती जागा मिळतील, याचा अचूक अंदाज वर्तवला आहे. यात प्रामुख्याने प्रत्येक विभागात कोणत्या आघाडीला किती टक्के मतदान मिळेल व किती जागांवर कोणाचा विजय होईल याचा अंदाज सांगितला आहे. तसेच ॲक्सिस माय इंडिया एक्झिट पोलमध्ये महायुती - 178-200 जागा जिंकू शकते तर महाविकास आघाडी ही 82-102 जागांवर विजयी होऊ शकते तसेच अन्य 06-12 जागांवर त्यांचा विजय होऊ शकतो, असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.

विशेष करुन राज्याची राजधानी असलेल्या मुंबई विभागात महायुतीला वर्चस्वाचा अंदाज लावला दिला आहे. परंतु महाविकास आघाडी देखील मुंबई विभागात मतदान घेण्यात मागे राहणार असल्याचा अंदाज वर्तवविला आहे. कारण, मुंबई मविआला जागा जास्त मिळत असल्या तरी या ठिकाणी मतदानाची टक्केवारीत दोन्ही आघाडीत फारसा फरक नसणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे अधिकृत निकाल 23 नोव्हेंबर 2024 रोजी घोषित केले जातील.

महाराष्ट्रात एकूण जागा- 288, विजयाचा आकडा- 145
विभागनिहाय कोणाला किती मिळतील जागा, खालीलप्रमाणे...
महाराष्ट्र - एक्झिट पोल - पश्चिम महाराष्ट्र (58 जागा)
महायुती - 36
महाविकास आघाडी - 21
वंचित बहुजन आघाडी - 0
अपक्ष - 1
------
मतदानाची टक्केवारी
महायुती - 48 टक्के
महाविकास आघाडी- 41 टक्के
वंचित बहुजन आघाडी - 2 टक्के
अपक्ष - 9 टक्के
-----
उत्तर महाराष्ट्र (एकूण जागा 47)
महायुती - 38
महाविकास आघाडी - 7
वंचित बहुजन आघाडी - 0
अपक्ष - 2
------
मतदानाची टक्केवारी
महायुती - 53 टक्के
महाविकास आघाडी- 32 टक्के
वंचित बहुजन आघाडी - 2 टक्के
अपक्ष - 13 टक्के
-----
मराठवाडा (एकूण जागा 46)
महायुती - 30
महाविकास आघाडी - 15
वंचित बहुजन आघाडी - 0
अपक्ष - 1
------
मतदानाची टक्केवारी
महायुती - 45 टक्के
महाविकास आघाडी- 38 टक्के
वंचित बहुजन आघाडी - 5 टक्के
अपक्ष - 12 टक्के
-----
कोकण आणि ठाणे (एकूण जागा 39)
महायुती - 24
महाविकास आघाडी - 13
वंचित बहुजन आघाडी - 0
अपक्ष - 2
------
मतदानाची टक्केवारी
महायुती - 50 टक्के
महाविकास आघाडी- 33 टक्के
वंचित बहुजन आघाडी - 2 टक्के
अपक्ष - 15 टक्के
----
मुंबई (एकूण जागा 36)
महायुती - 22
महाविकास आघाडी - 14
वंचित बहुजन आघाडी - 0
अपक्ष - 0
------
मतदानाची टक्केवारी
महायुती - 45 टक्के
महाविकास आघाडी- 43 टक्के
वंचित बहुजन आघाडी - 2 टक्के
अपक्ष - 10 टक्के
मराठवाड्यात 30 जगांवर महायुतीला यश
अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, मराठवाड्यात एकूण 46 विधानसभेच्या जागा आहेत. यापैकी 30 जागांवर महायुतीला यश मिळणार आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 15 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर एका जागेवर अपक्ष किंवा बंडखोर जिंकून येण्याची शक्यता आहे.
खान्देशमध्ये 38 जगांवर यश येईल
उत्तर महाराष्ट्र म्हणजेच खान्देशात विधानसभेच्या एकूण 47 जागा आहेत. यापैकी सर्वाधित जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकून येतील, असा दावा पोलच्या आकडेवारीनुसार करण्यात आला आहे. पोलच्या आकड्यांनुसार, महायुतीला तब्बल 38 जागांवर यश येईल. तर महाविकास आघाडीला केवळ 7 जागांवर यश मिळवता येईल. तर अपक्षांना 2 जागांवर यश मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात 21 जगांवर यशाची शक्यता
पश्चिम महाराष्ट्रात 36 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 21 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहेत. तर इतरांना 1 जागावर यश मिळू शकते, असे पोलनुसार सांगण्यात येत आहे.
कोकणात महायुती आणि आघाडीत रस्सीखेच
पोलनुसार, कोकण आणि ठाण्यात महायुती आणि महाविकास आघाडीत टफ फाईट होण्याची शक्यता आहे. या भागात महायुतीला 24 तर महाविकास आघाडीला 23 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 2 ठिकाणी यश मिळू शकते.
मुंबईत 22 जगांवर महायुतीला यश येईल
मुंबई शहरात एकूण 36 विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी 22 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय होईल. तर 14 जागांवर महाविकास आघाडीला यश येईल, असा दावा या एक्झिट पोलमध्ये करण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications