वाद वाढला..! रोहित पवार, राजेश टोपेंसह 50 जणांना पाडणार... हाकेंनी दिला 'हा' इशारा...
मराठा व ओबीसी आरक्षणाचा वाद दिवसेंदिवस वाढत आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी, या दोन्ही समाजातील नेते आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यातच काल ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी एक धक्कादायक विधान केले.
राज्यातील ज्या नेत्यांनी मनोज जरांगेंना पोसलंय, त्यांच्या आंदोलनाला रसद पुरवली आणि ओबीसी आरक्षण पळवण्याच्या प्रयत्न केलाय अशा 50 उमेदवारांना पाडणार असल्याचं लक्ष्मण हाके यांनी सांगितलं. शिवाय ज्या उमेदवारांना पाडायचंय त्यांची यादीही कालच तयार केलीय, असंही त्यांनी स्पष्ट केलं. रोहित पवार, राजेश टोपेंचा या यादीत समावेश असल्याचं हाकेंनी सांगितल्यानं एकच खळबळ उडाली.

ओबीसी नेत्यांना हाके यांनी केले आवाहन
प्रसारमाध्यमांशी बोलताना हाके यांनी आपली आगामी रणनिती स्पष्ट केली. ते म्हणाले, ओबीसी आरक्षणाची गरज आहेच. सामान्य ओबीसीच्या हितासाठी ओबीसी नेत्यांनी समोर यावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हैदराबाद गॅझेट किंवा इतर बाबींतून ओबीसी आरक्षण घालवतील. त्यामुळे विदर्भातील ओबीसी नेत्यांनी समोर येण्याची विनंतीही हाके यांनी केली. ते पुढे म्हणाले की, आम्ही आज 50 उमेदवार पडण्याची यादी तयार केली आहे. जे 50 उमेदवार निवडून आणायचेत त्यांचीही यादी लवकरच तयार करु. ओबीसींची लोकसंख्या 50 ते 60 टक्के आहे. मग शरद पवार, एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना ओबीसींची भिती कधी वाटणार आहे..? असा सवालही हाकेंनी उपस्थित केला.
रोहित पवार, राजेश टोपे हेच लक्ष
हाके म्हणाले, ज्यांनी मनोज जरांगे यांना मदत केली, रसद पुरवली, त्यांना आम्ही पडणार आहोत. रोहित पवार, राजेश टोपे, यांच्यासारखे 50 उमेदवार आमचे लक्ष आहेत. ओबीसीची भूमिका मांडणारे तरुण आमदार आता विधानसभेत दिसतील. यावेळी हाकेंनी मुख्यमंत्र्यांनाही लक्ष केलं. ते म्हणाले, मुख्यमंत्री हे एका जातीचे नाहीत. लक्ष्मण हाके दारू पिला म्हणत, ते ओबीसी आरक्षण घालवू पाहत आहेत. जो पक्ष ओबीसींचा मुद्दा लावून धरेल तोच आम्ही सत्तेत बसवू.
फडणवीसांचा हकनाक बळी
हाके पुढे म्हणाले, शिंदे समिती बेकायदा समिती आहे. मराठा समाज गरीब असू शकतो, मात्र ओबीसी आरक्षणामुळे मराठा गरीब कसा असू शकतो? फडणवीस म्हणतात, मराठ्यांना एक लाख रोजगार दिले. मग त्याच एक लाख मराठा तरुणांची माथी भडकवण्याचे काम एकनाथ शिंदे, रोहित पवार करत आहेत. फडणवीसांना टार्गेट केलं जातंय. फडणवीसांनी यांचं ऑडिट करावं. शरद पवारांना मतं मागण्यासाठी दुसरे काही कारण उरले नाही, असेही हाके यांनी स्पष्ट केलं.












Click it and Unblock the Notifications