Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नगरमध्ये काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर! इच्छुकांच्या मुलाखतीमध्ये दोन गट भिडले, अन् ...

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला आता दिवसेंदिवस वेग येत आहे. राज्यात कधीही तारखा जाहीर होऊ शकतात. त्यामुळे सर्वच पक्षांच्या वतीने तयारी केली जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शेवगाव मतदारसंघासाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना गोंधळ उडाल्याचा प्रकार घडला होता. या पाठोपाठ आता काँग्रेस पक्षाची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसच्या विधानसभा निहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असताना दोन गटात गोंधळ उडाला अन् कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात विरोधात घोषणाबाजी करताना दिसून आले.

Maharashtra Assembly Election 2024

जरांगे यांची भूमिकाही ठरणार महत्त्वाची

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना राज्यात रंगणार असल्याचे चित्र सद्यस्थितीत आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे यांची भूमिका देखील तितकीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अशातच कॉंग्रेस व भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. परंतु, पक्षांतर्गत वाद आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.

काँग्रेसची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर!

आज श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या विधानसभा निहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू होत्या. या मुलाखती सुरु असताना दोन्ही गटात गोंधळ उडाला. यामुळे काँग्रेस पक्षाची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांचा धिक्कार करत काँग्रेसच्या दुसऱ्या गटाकडून घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेसचे पक्ष निरीक्षक आ. मुज्जफर हुसेन यांच्यासमोर काँग्रेसच्या दोन गटात गोंधळ उडाला. काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांच्याविरोधात काँग्रेसचे इच्छुक उमेदवार हेमंत ओगले यांच्या गटाकडून शक्तीप्रदर्शन करत घोषणाबाजी करण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

भाजपच्या मुलाखतीतही घडला होता गोंधळ!

दरम्यान, 1 ऑक्टोबरला पाथर्डी शेवगाव मतदारसंघासाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत होत्या. नाशिकचे प्रभारी आणि अहमदनगर जिल्ह्याचे निवडणूक निरीक्षक म्हणून विजय साने हे या मुलाखती घेत होते. यावेळी विद्यमान आमदार मोनिका राजळे पक्षपाती करत असल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीत खोटे पदाधिकारी दाखवून मत नोंदणीचा प्रयत्न केल्याने दोन गटात चांगलाच वाद उडाल्याचे दिसून आले. तर काही पदाधिकाऱ्यांना मुलाखतीबाबत कळवण्यातच आले नसल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुलाखती सुरू असताना गोंधळ झाल्याने काही काळ विजय साने यांनी कामकाज थांबवले होते. या गोंधळामुळे भाजपच्या दोन गटांमधील अंतर्गत कलह बाहेर आला आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+