Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

धक्कादायक! आश्रमचालक महाराजाचा अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, 'असे' उघड झाले प्रकरण

बदलापुरातील चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यात अशी अनेक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. आता छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यातील हतनूर शिवारातील एका कन्या आश्रमात तेथील 68 वर्षीय आश्रमचालकानेच दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Ashram Chalaka Maharaj arrested for abuse of minor girls in aurangabad

मिळालेल्या माहितीनुसार दादासाहेब पुंडलिक अकोलकर ( वय 68) महाराज, मागील आठ ते दहा वर्षांपासून जैतापूर रस्त्यावर माऊली वारकरी शिक्षण कन्या आश्रम चालवतो. या वारकरी शिक्षण कन्या आश्रमात आठ ते 18 वर्षे वयाच्या 18 ते 20 मुली धार्मिक शिक्षण घेतात.

या मुली दिवसा शाळेत शिक्षण घेतात आणि रात्री आश्रमात वास्तव्यास असतात. सकाळी व सायंकाळी दादासाहेब अकोलकर या मुलींना धार्मिक शिक्षण देत असतो. 20 आॅगस्टची रात्री अकोलकरने महाराजान आश्रमातील 13 वर्षांच्या मुलीला रात्री बाराच्या सुमारास त्याच्या खोलीत बोलावले. तिच्यावर अत्याचार केला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याच रात्री त्याने दुसऱ्या एका मुलीवरही अत्याचार केले असल्याचे उघड झाले आहे.

अशी झाली वाच्यता

नराधम अकोलकरने पीडित मुलींना त्याने केलेल्या अत्याचाराबाबत कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली होती. हा प्रकार कुणाला सांगितला नाही तर तुम्हाला मी काहीही शिकविणार नाही असा त्याने दम भरला. यामुळे पीडित मुली जास्तच भेदरल्या.

या मुलींकडे मोबाईल किंवा इतर काही संपर्काचे साधन नसल्याने त्या शांत रहिल्या. नंतर त्यांनी शाळेतील शिक्षकांना हा सगळा प्रकार सांगितला. शिक्षकांच्या मोबाईलवरुन हा प्रकार पालकांना कळवला. नंतर पालक आणि मुलींनी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर 'पोस्को'अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सुरु आहे.

इतर मुलींवरही अत्याचार केल्याची शक्यता

आरोपीने आश्रमातील इतर मुलींना आपली शिकार बनविले आहे याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या दृष्टीने या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. धार्मिक शिक्षण देणा-या आश्रम चालक महाराजाने अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याने सगळीकडे खळबळ उडाली असून जनतेतून संतापाची प्रतिक्रिया उमटत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+