Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मला संपवू नका, मी नसलो, तर तुम्हीही राहणार नाही; अशोक चव्हाणांचा रोख नेमका कुणावर?

मला राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न करू नका, जर मी राहिलो नाही, तर तुम्हीही राहणार नाही, असे परखड मत माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी मांडले. तर चव्हाण यांनी थेट विरोधकांवर निशाणा साधला आहे. नांदेडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात अशोक चव्हाण यांनी हे विधान केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा कॉंग्रेसचे एकेकाळचे बडे नेते राहिलेले अशोक चव्हाण यांनी साधारणत: लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. परंतु, अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड जिल्ह्यात त्यांना लोकसभेला म्हणावी तशी कामगिरी दाखवता आली नाही. अशोक चव्हाण यांचे पाहुणे असलेले विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांना पराभवाचा सामना करावा लागला.

Ashok Chavan

लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण राजकीय पटलावर मागे पडलेत, अशी चर्चा देखील सुरू झाली. या ठिकाणी कॉंग्रेस उमेदवाराचा विजय झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. तसेच महाविकास आघाडीकडून त्यांच्यावर सातत्याने टीकेची झोड उठवली गेली. अनेकदा गावोगावी गेल्यानंतर मराठा आंदोलकांकडून देखील त्यांचा उघडपणे विरोध केला जाऊ लागला. त्यामुळे अशोक चव्हाण सद्या चिंतेत असल्याची प्रचिती त्यांच्या या विधानातून दिसून आली आहे.

नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण!

एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी विरोधकांना मला संपवू नका, कारण मी राहिलो नाही, तर तुम्हीही राहणार नाही, अशी भावना व्यक्त केली. तसेच मला संपवण्याएवढे मी कुणाचेही वाईट केलेले नाही.

अशोक चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, मला संपवण्याएवढे वाईट मी कुणाचेही केले नाही. एकवेळ टीव्ही बंद पडेल, पण विरोधकांची ही टीका थांबणार नाही. त्यांची टीका 24 तास सुरू असते. विरोधकांना माझे नाव घेतल्याशिवाय काही करमत नाही. विकासात्मक कामे करण्यासाठी जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सदैव तुमच्यासोबत आहे. आपल्यात कोणतेही मतभेद नाहीत. पण विरोधकांना माझे नाव घेतल्याशिवाय करमत नाही. पण त्यांनी देखील माझा विरोध करण्यापूर्वी विचार केला पाहिजे.

..तर तुम्ही देखाल संपाल...!

अशोक चव्हाण म्हणाले की, उद्या मी राहिलो नाही तर विरोधक कुणावर बोलणार? राजकीय क्षेत्रात कुणावर भाष्य करणार? त्यामुळे मलाही जिवंत ठेवा असे माझे म्हणणे आहे. मी जिवंत राहिलो तर तुम्ही पण जिवंत राहाल. पण मीच संपलो, तर तुमचे काय होणार? तुम्ही देखील संपलेच समजा. तुमच्याकडे बोलण्यासाठी काहीही राहणार नाही. त्यामुळे मला संपवू नका. जी मंडळी सातत्याने माझ्यावर टीका करत आहे, त्यांना मी हे सांगत आहे. त्यांचे 24 तास तोंड सुरू असते. मी एवढे कुणाचेही वाईट केले नाही. माझे म्हणणे एवढेच आहे की, इथपर्यंत येण्यासाठी 40 वर्षे लागली आहेत मला.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+