Ashadhi Ekadashi: सण आला पंढरीचा मेळा..! आषाढी एकादशीच्या आप्तस्वकियांना पाठवा 'या' खास शुभेच्छा!
Ashadhi Ekadashi 2025 Wishesh/Shubhechha in Marathi : श्रद्धेचा महासागर, भक्तीचा अपार झरा अन् विठ्ठलनामाच्या अखंड गजराने भारलेल्या पवित्र आषाढी एकादशीचा आज दिवस. पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पायी जाणाऱ्या भाविक आज विसावा घेतात. आपल्या विठुरायाचे मनोभावे दर्शन घेतात. महाराष्ट्रात आजचा हा मोठा सण मानला जातो. घरोघरी आज पूजा अर्चना केली जाते, उपवास हरिपाठ केला जातो.
या दिवशी विठ्ठलाच्या चरणी केलेली प्रत्येक प्रार्थना आपल्याला नवा विश्वास देत असते. संसाराच्या गडद काळोखात आशेचा दीप लावणारा हा उत्सव, आपल्याला प्रेम, शांती, आणि सदाचाराची वाट दाखवतो.
आजच्या दिवशी तुम्हीही तुमच्या आप्तस्वकियांना शुभेच्छा पाठवा, खालील दिलेले संदेश पाठवून तुम्ही सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा पाठवा, अन् मनोभावे हा उत्सव साजरा करा.

- विठ्ठलाच्या पायी वीट, झाली भाग्यवंत!
- पहाताच होती दंग आज सर्व संत
- आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
- सोहळा जमला आषाढी वारीचा
सण आला पंढरीचा मेळा
जमला भक्तगणांचा ध्यास
विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा!
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
- तुझा रे आधार मला तूच रे पाठीराखा तूच रे
- माझ्या पांडुरंगा चुका माझ्या देवा घे रे तुझ्या पोटी
- तुझे नाम ओठी सदा राहो
- आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!
- सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा,
- मेळा जमला भक्तगणांचा,
- ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
- आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
- विठू माऊलीची कृपा आपणा सर्वांवर कायम राहो...
- जय हरी विठ्ठ्ल! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
विठू माऊली तू माऊली जगाची,
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची,
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
- सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझे!
- आषाढी एकादशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
आषाढी एकादशीच्या दिवशी
श्री विठ्ठलाच्या चरणी अपार श्रद्धा ठेवून
मनातील सर्व दु:ख, चिंता दूर होवोत
तुमचं आयुष्य भक्ती, प्रेम आणि समाधानाने भरून जावो!
जय विठ्ठल विठ्ठल! पंढरीनाथ महाराज की जय!
देवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आषाढी एकादशीच्या दिवशी विठोबाच्या चरणी लीन होऊन
आपले जीवन भक्तीमय व्हावे, हीच प्रार्थना!
तुमच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि समृद्धी नांदो.
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आजचा दिवस आहे असीम भक्तीचा
विठ्ठलाच्या पायावर मन अर्पण करूया
चांगुलपणाचा मार्ग अनुसरुया!
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!
विठ्ठल नाम घेता, दुःख - चिंता हरपते
आजच्या दिवशी प्रेम, शांती, भक्तीची अनुभूती होवो
तुमचं जीवन सदैव मंगलमय होवो!
देवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

आषाढ महिन्याची एकादशी, भक्तीचा सण
पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन लाभो
मनाला शांती आणि आयुष्याला उजाळा मिळो
शुभ आषाढी एकादशी 2025!
जीवनात शांती हवी असेल
तर हृदयात विठ्ठल असायलाच हवा
आषाढी एकादशीच्या दिवशी
त्या श्रीहरीच्या कृपेने तुमचं जीवन फुलो
शुभ आषाढी एकादशी 2025!
वारीचे पावित्र्य आणि
वारकऱ्यांची भक्ती पाहून
पांडुरंगही आनंदी होतो
तोच आनंद तुमच्या आयुष्यात सदैव नांदो
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
हेची दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
आषाढी एकादशी 2025 हार्दिक शुभेच्छा
विठ्ठल नाम घेत चला
दुःख विसरून जा
पंढरीची वारी चालली
भक्तीने न्हालं सर्व जग
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
उभा विठोबा विटेवरी
हात जोडूनी वाट पाहतो
वारकऱ्यांच्या भक्तीतून
पंढरपूर गात राहतो!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल
आषाढीच्या वारीत भक्तीचा उत्सव
मन आणि जीवन विठोबाला अर्पण
पंढरीनाथा तूच माझा देव
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
डोक्यावर फेटा, खांद्यावर झोळी
मुखी हरिपाठ आणि तोंडात विठ्ठलनाम
वारीत चालताना वाटते जणू
साक्षात वैकुंठ साकार झाले
Aashadhi Ekadashichya Shubhechha 2025!
विठोबाचं दर्शन,म्हणजे स्वर्गीय आनंद
आषाढी एकादशी म्हणजे
भक्तीचा सुंदर प्रबंध
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
तू उभा विटेवरी, आम्ही मन विटेवर ठेवलं
आषाढी एकादशी आली पंढरपूर पुन्हा भक्तिमय वातावरणात न्हालं
Aashadhi Ekadashichya Shubhechha 2025!
पंढरपूरची वारी
मन भक्तीने भारलेलं
आषाढी एकादशीचं तेज
जग उजळवून टाकणारे
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
टाळ मृदंगाचा गजर
हातात भगवी पताका
विठोबाच्या नामाने चालले
सारे वारकरी एका ताकदीने
Aashadhi Ekadashichya Shubhechha 2025!
आषाढीच्या या पवित्र दिवशी
विठ्ठल माऊली आठवावी
भक्तीच्या या आनंदात
आपली मने न्हावी
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
विठ्ठल माऊली माझी
पंढरपूरचा राजा
आषाढीच्या वारीत चालतो
माझा अंतःकरणाचा राजा
Aashadhi Ekadashichya Shubhechha 2025!
विठोबा सखा
रखुमाईची साथ
आषाढी एकादशीला
पंढरपुरात झाली माझी प्रभात
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
असा कोणता राजा
जो उभा राहतो वाट पाहत
तोच आमचा विठोबा
भक्तांच्या प्रेमात हरवलेला
Aashadhi Ekadashichya Shubhechha 2025!
पंढरीची वाट
म्हणजे भक्तीचा घाट
विठोबाच्या नामात
हरवते जीवनाची वाट
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
विठोबाच्या दर्शनासाठी
मन झेपावतं पंढरपूरकडे
आषाढीच्या एकादशीला
भक्तीचं सोने उधळते आसमंतात
देवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
अवघा रंग एक झाला,
रंगी रंगला श्रीरंग
देवशयनी आषाढी
एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
- अबीर गुलाल उधळीत रंग
- नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
- तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!












Click it and Unblock the Notifications