दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ, अविनाश राणेंना आमदार होण्याची संधी
Maharashtra Assembly Election 2024 : मुंबईतील 36 मतदारसंघांपैकी अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघाकडे सध्या सर्वांचेच लक्ष लागले आहे. या मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादीच्या भांडणात शिंदे गटाचे उमेदवार अविनाश राणे यांचे पारडे जड समजले जात आहे. येथून शिवसेना शिंदे गटाकडून अविनाश राणे, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून सना मलिक, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून फहाद अहमद, आणि मनसेचे नवीन आचार्य यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. शिंदे गटाने गेल्या काही दिवसांपासून येथे घातलेले लक्ष, अविनाश राणेंसारखा आक्रमक व लोकप्रिय चेहरा यामुळे ही लढत शिंदे गटासाठी सोप्पी असल्याचे बोलले जातेय. शिंदे गटाचे पारडे येथून जड का, याच प्रश्नांची उत्तरे आपण पाहू...
मलिकांच्या लोकप्रियतेला ओहटी
महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक इथून आमदार राहिलेले आहेत. 2009 व 2019 मध्ये त्यांनी येथून आमदारकी केली. 2014 साली त्यांचा शिवसेनेच्या उमेदवाराकडून पराभव झाला होता. आता नवाब मलिक यांच्या जागी त्यांची मुलगी सना मलिक शेख या जागेवरून निवडणूक लढवत आहे. नवाब मलिक तुरुंगात गेल्यावर सनानेच या मतदारसंघाची जबाबदारी सांभाळली. मात्र भाजपने नवाब मलिकांच्या उमेदवारीला विरोध केल्यानंतर त्यांनी त्यांच्या जागी त्यांच्या मुलीला उमेदवारी मिळवून दिली. भाजपचा विरोध, दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप व तुरुंगवारी आदी कारणांमुळे नवाब मलिकांचा या मतदारसंघातील पकड ढिली झाल्याचे बोलले जात आहे. त्याचाच फायदा येथून शिंदे गटाला होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

अभिनेत्रीच्या पतीला उमेदवारी
पुतण्या अजित पवारांनी येथून सना खान यांना उमेदवारी दिल्यानंतर, काका शरद पवार यांनी या जागेवर अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांना उमेदवारी दिलीय. ही जागा अल्पसंख्याक बहुल आहे. त्यामुळे मुस्लिम मतांचे धृविकरण करण्यासाठीच अभिनेत्री स्वरा भास्करचा पती फहाद अहमद यांना शरद पवारांनी उमेदवारी दिल्याचे बोलले जातेय. शिवाय नवाब मलिक यांच्यावरील रागही शरद पवारांनी मतांचं धृविकरण करत दाखवून दिल्याचंही दिसतं. अणुशक्तीनगर मतदारसंघात फहाद अहमद आणि सना मलिक शेख यांच्यातील मतविभागणी ही शिंदे गटाचे अविनाश राणे यांच्यासाठी फायदेशिर ठरणार असल्याचे चित्र आहे.
मनसेच्या उमेदवाराचा आघाडीला फटका
अणुशक्ती नगर या मतदारसंघात मनसेचाही दबदबा आहे. मनसेला 2009 च्या विधानसभा निवडणुकीत 16 हजार 737 मते, 2014 च्या निवडणुकीत 3 हजार 285 मते आणि 2019 च्या निवडणुकीत 5 हजार 879 मते मिळाली होती. मनसेने येथून नवीन आचार्य यांना उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीचा फटका हा महाविकास आघाडीला व फायदा शिंदे गटाला बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसही या जागेवर आग्रही होते. त्यामुळे शरद पवार गटाच्या उमेदवाराला ते किती साथ देतील याबाबतही शंका आहे.
भाजपची ताकद शिंदे गटामागे
नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपने विरोध केला होता. तरीही अजित पवार गटाने सना मलिक यांना निवडणुकीत उतरवले. त्यामुळे भाजपची येथील एकगठ्ठा ताकद शिंदे गटाच्या उमेदवारामागे राहणार, हे निश्चित आहे. या मतदारसंघात अल्पसंख्यांकाच्या मतांचे विभाजन होऊन, हिंदूंची मते ही शिंदे गटाच्या पारड्यात पडतील, अशीही गणिते जुळवली जावू शकतात. 2014 मध्ये त्यांचा शिवसेनेचे उमेदवार तुकाराम काटे यांच्याकडून नवाब मलिक यांचा पराभव झाला होता. शिवसेनेचे तुकाराम काटे यांनी राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांचा 1007 मतांनी पराभव केला होता. यावेळी पुन्हा मतविभागणीचा फायदा शिंदे गटाच्या उमेदवाराला मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
वाढलेली मते शिवसेनेच्या फायद्याची
2019 मध्ये अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 51 हजार 916 मतदार होते. त्यावेळी नवाब मलिकांना 65,217 मते तर शिवसेनेचे उमेदवार तुकाराम काटे यांना 52,466 मते होती. म्हणजेच येथे शिवसेनेचा उमेदवार कायम पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहतो. यंदाही तीन लाखांच्या आसपास मतदार आहेत. भाजप व शिंदे गटाने या मतदारसंघात केलेली कामे, राबवविलेल्या योजना, नवमतदारांसाठी राबवविलेली मोहिम या अविनाश राणे यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरणार आहेत. शिवाय गेल्या वर्षभरात शिंदे गटाच्या माध्यमातून राणे यांनी अनेक योजना थेट मतदारांपर्यंत पोहचविल्या आहेत. त्याचा फायदा त्यांना होईल, असे राजकीय विश्लेषक सांगतात.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन!










Click it and Unblock the Notifications