Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पंकजा मुंडेंचे कांड करण्यासाठी धनंजय मुंडेंनी फाईल आणून दिल्या; अंजली दमानियांचा गौप्यस्फोट

Anjali Damania Attacks Dhananjay Munde and Rajendra Ghatwat : धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे व्यक्तीमत्त्व राजेंद्र घनवट यांनी शेतकऱ्यांचा छळ करत कमी दराने त्यांच्या जमीनी खरेदी केल्या. लोकांनी तक्रारी केल्या तरी देखील मुंडे यांच्या जवळचा असल्याने त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई झाली नाही.

उलट या घनवट नावाच्या व्यक्तीने या विरोधात लढणाऱ्या शेतकऱ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला. पुढे त्यांनी पाच वर्षांपूर्वीची आठवणी देखील सांगितली, जेव्हा पंकजा मुंडेविरोधात फाईल घेऊन हे लोक माझ्याकडे आले होते, तेव्हा त्यात घनवटचा देखील समावेश आहे.

कराड सारखाच घनवट देखील जवळचा व्यक्ती

अंजली दमानिया पुढे बोलताना म्हणाल्या की, राजेंद्र घनवट कोण आहेत तर जसे कराड धनंजय मुंडेंच्या जवळ होते तसेच घनवट हे देखील मुंडेंच्या जवळचे आहेत. व्यकंटेश्वरा कंपनीचे दोन डायरेक्टर आहेत, ते म्हणजे राजश्री धनंजय मुंडे आणि राजेंद्र पोपटलाल घनवट आहेत. यासह जगमित्र शुगरमध्येही राजेंद्र घनवट हे डायरेक्टर आहेत.

Anjali Damania

20 कोटींची जागा 8 लाखात घेतली

अंजली दमानिया म्हणाल्या की, राजेंद्र घनवट यांनी 11 शेतकऱ्यांचा छळ करत शेती खरेदी केली. यामध्ये एका शेतकऱ्याची 20 कोटींची जमीन 8 लाख रुपयांमध्ये खरेदी केली गेली तर दुसरीकडे एका शेतकऱ्यांची 1 कोटीची शेती 4 लाख रुपयांमध्ये खरेदी केली गेली, असा आरोप दमानिया यांनी केला आहे.

पंकजा मुंडेंविरोधात फाईलचा गठ्ठा आणला

अंजली दमानिया म्हणाल्या की, पंकजा मुंडे यांच्याविरोधात माझ्याकडे फाईलचा गठ्ठा घेऊन तेजस ठक्कर आणि राजेंद्र घनवट आले होते, मी दिलेल्या फाईलवर काही बोलत नाही असे मी त्यांना सांगितले होते. पंकजा मुंडेंचा विषय तेव्हा मी लाऊन धरला नाही. मी जेव्हा बीडचे प्रकरण लाऊन धरले तेव्हा राजेंद्र घनवट यांचे नाव मी एका वृत्तवाहिनीवर घेतल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी मला संपर्क केला. त्यांनी मला सांगितले की अनेक शेतकऱ्यांचे कमी भावात जमीन विक्री करावी म्हणून छळ करण्यात आले. राजेंद्र घनवट यांनी हे छळ केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

मृत व्यक्तीच्या नावाने व्यवहार

अंजली दमानिया म्हणाल्या की, राजेंद्र घनवट यांच्याविरोधात जे जी लोकं लढली त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करत त्यांना कारागृहात पाठवण्यात आले. मीरा सोनवणे, चिखले यांचा छळ केला. मीरा सोनवणे यांच्या घरातील एका व्यक्तीचा 1997 मध्ये मृत्यू झाला त्या व्यक्तीला 2006 मध्ये जिंवत दाखवून त्यांचा व्यवहार झाला असे दाखवले. मीरा सोनवणे शेतात काम करत असताना त्यांच्या बहिनीबद्दल अश्लील वक्तव्य केले. त्यानंतर 307 चा गुन्हा त्यांनी दाखल केला, हे केवळ सोनवणे, चिखले कुटुंबियांसोबत नाही तर अनेक शेतकरी कुटुंबियांसोबत घडले.

नेत्यांना हाताशी धरत जमीन बळकावल्या

अंजली दमानिया म्हणाल्या की, माझ्याकडे पोपट घनवट यांचे व्हिडिओ आहेत. त्यात ते म्हणत आहे की, मला दोन मुलं आहेत ते दोघेही एमबीए आहेत, पण आम्ही सगळ्या चांगल्या राजकीय लोकांशी संबंध ठेवले आहेत म्हणून आम्ही अशा अनेक जमीनी घेऊ शकलो. हेच आपल्याला सांगते की ही लोकं राजकीय नेत्यांना हाताशी धरत सामान्य शेतकऱ्यांची जमीन कवडीमोल भावाने दमदाटी करत खरेदी करतात.

बावनकुळेंनी व्यवहाराची चौकशी करावी

अंजली दमानिया म्हणाल्या की, घनवट यांचा संजय उर्फ आनंद चव्हाण नावाच्या व्यक्ती आहे. त्यांच्या नावावर सर्व अणिकार घेतले जातात, तो त्यांचा कसा गैरवापर करतो यांची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे. पोपट घनवटवर अनेक गुन्हे दाखल असताना हा व्यक्ती त्याची बी समरी करुण घेतो. पण मी गृहमंत्र्यांना हे सर्व गुन्हे पुन्हा ओपन करा या मागणीचे पत्र पाठवणार आहे. या शेतकऱ्यांना मी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवणार असून त्यांच्या जमीनीच्या व्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी करणार आहे.

त्यांच्या पाठिशी धनंजय मुंडेंसारखे राजकारणी

अंजली दमानिया म्हणाल्या की, घनवट आणि धनंजय मुंडे यांचा कसा संबंध आहे, त्यांचे व्यवहार कसे आहेत, आर्थिक व्यवहार किती आहेत याची चौकशी झाली पाहिजे, अशी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे. 2004 पासून हा सर्व प्रकार सुरू आहेत. त्यांच्याविरोधात यंत्रणा काहीच बोलत नाही कारण त्यांच्या पाठिशी धनंजय मुंडेंसारखे राजकारणी आहेत. घनवट आणि मुंडे हे थेट पार्टनर आहेत, कुठली पोलिस यंत्रणा असे असल्यावर त्यांच्यावर कारवाई करेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+