Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सत्तांतराच्या मस्तीला योग्य प्रत्युत्तर देऊ;राजन पाटलांच्या मुलाला अजित दादांच्या शिलेदाराचा इशारा!

Angar Nagarpanchayat and Ajit Pawar controversy : सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीवरून सध्या जिल्ह्याच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते राजन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही, राष्ट्रवादीने त्यांना आव्हान देण्यासाठी कंबर कसली होती. मात्र, राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर राजन पाटील यांच्या समर्थकांनी आणि विशेषतः त्यांच्या मुलाने केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि आमदार अमोल मिटकरी यांनी अत्यंत कठोर शब्दांत राजन पाटील यांच्या कुटुंबाला 'वॉर्निंग' दिली आहे.

Angar Nagarpanchayat and Ajit Pawar controversy

अर्ज बाद होताच अनगरमध्ये राजन पाटील समर्थकांचा जल्लोष!

सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीची निवडणूक गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. अनेक वर्षांपासून अनगरवर राजन पाटील यांची एकछत्री सत्ता राहिली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राजन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत अजित पवारांनी थेट राजन पाटील यांच्या सुनेसमोर आव्हान उभे केले होते. राष्ट्रवादीकडून उज्ज्वला थिटे यांना नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरवण्यात आले होते.

राजन पाटील यांच्या पॅनेलचे १७ उमेदवार नगरपंचायतीत बिनविरोध निवडून आले असले तरी, नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटे यांनी शड्डू ठोकल्यामुळे राजन पाटील यांची काहीशी कोंडी झाली होती.

मात्र, मंगळवारी उमेदवारी अर्जांच्या छाननीत एक नाट्यमय घडामोड झाली. तांत्रिक कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून कोणाचीही सही नव्हती, हे कारण देत अर्ज रद्द करण्यात आला.

उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर राजन पाटील यांच्या समर्थकांनी अनगर नगरपंचायतीबाहेर मोठा जल्लोष केला. जणू काही निवडणूक जिंकल्याप्रमाणेच गुलाल उधळत हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

बाळराजे पाटलांचे अजितदादांना थेट आव्हान!

या जल्लोषात राजन पाटील यांचे थोरले चिरंजीव विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील आघाडीवर होते. त्यांनी उत्साहाच्या भरात प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना आव्हान दिले. बोट दाखवत बाळराजे पाटील यांनी उच्चारलेले वाक्य चांगलेच व्हायरल झाले:

"अजित पवार तुम्ही सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाही."

बाळराजे पाटील यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात याची मोठी चर्चा रंगली आहे. त्यांनी अजित पवार यांना दिलेले हे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना चांगलेच खटकले आहे.

अमोल मिटकरींचा राजन पाटील कुटुंबाला कठोर इशारा
राजन पाटील यांच्या मुलाने अजित पवार यांना दिलेल्या या आव्हानाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि स्टार प्रचारक अमोल मिटकरी यांनी अत्यंत तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. मिटकरींनी राजन पाटील आणि त्यांच्या मुलांवर अत्यंत कठोर टीका केली आहे.

अमोल मिटकरी काय म्हणाले?

"राजन पाटील आणि त्यांची दोन्ही वाया गेलेली मोकाट कार्टी यांना सत्तेचा अतिमाज आला आहे. ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांच्याबद्दल केलेली मस्तीची भाषा याला प्रसंगी योग्य उत्तर देऊच. पण तूर्तास या औलादींच्या मस्तीच्या वागण्याने 'मालकाला' भिकारी बनवेल.. तुर्तास इतकेच."

मिटकरींनी राजन पाटील यांच्या मुलांना "वाया गेलेली मोकाट कार्टी" आणि "सत्तेचा अतिमाज" आल्याची टीका केली आहे. तसेच, "ज्यांच्या तुकड्यावर जगलात" असा उल्लेख करून, राजन पाटील यांच्या पूर्वीच्या राजकीय आश्रयाबद्दल त्यांना आठवण करून दिली आहे. ही मस्तीची भाषा योग्य वेळी परतफेड केली जाईल, असा स्पष्ट इशारा मिटकरींनी दिला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+