अमरावतीत खाजगी बस पुलावरुन खाली कोसळली, तिघांची प्रकृती चिंताजनक
Amravati Bus Accident : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील दुर्गम भागात एका खाजगी बसला् भीषण अपघात झाला आहे. परतवाडा धारणी मार्गावर सेमाडोह जवळ प्रवाशांनी भरलेली खाजगी बस पुलावरुन खाली कोसळली आहे. या अपघातात 50 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर, तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार परतवाडा धारणी मार्गावर वळणवरील रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने प्रवाशांनी खचाखच भरलेली बस पुलावरुन कोसळली आहे. परतवाडा धारणी मार्गावर जवळ हा अपघात घडला आहे. सर्व जखमी प्रवाशांना सेमोडो प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पुलावरुन खाली कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, पुलाचा कठडा तोडून बस पुलावरुन खाली कोसळली. या बसमध्ये 50 प्रवासी असल्याची माहिती मिळतेय. या अपघातात काही प्रवाश्यांना किरकोळ जखमी झाले आहेत. तीन प्रवाश्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

दरम्यान बस पुलावरुन खाली कोसळ्याने प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला. प्रवाशांना बसच्या खिडकीतून बाहेर काढण्यात आलं. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक व प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पोहोचवून बचावकार्य सुरू केले. स्थानिक लोकांनी बसमधून प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. तसेच जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. अपघातच्या ठिकाणी पोलिस अधिकारी व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित आहेत.












Click it and Unblock the Notifications