"सर्वांचे रेकाॅर्ड माझ्याकडे! अधिकारी अन् नेत्यांनी गाढवावरून मिरवणूक काढेल!" - 'या' नेत्याचा इशारा

Ambadas danve warns officials slams bjp imported candidates : राज्यात विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडाला असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सत्ताधारी महायुती आणि प्रशासकीय यंत्रणेवर तोफ डागली आहे. "आमच्या उमेदवारांना फोन करून धमकावणाऱ्या अधिकाऱ्यांनी गाढवावरून मिरवणुकीसाठी तयार राहावे, सर्वांचे रेकॉर्ड माझ्याकडे आहेत," अशा शब्दांत दानवे यांनी आपला संताप व्यक्त केला.

Ambadas danve warns officials slams

भाजपवर बोचरी टीका: "सर्वात मोठा पक्ष नव्हे, तर फुगा!"

भारतीय जनता पक्षावर टीका करताना दानवे म्हणाले की, भाजप स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवून घेतो, मात्र निवडणुकीच्या वेळी त्यांना बाहेरून उमेदवार 'आयात' करावे लागतात. राजकीय पार्श्वभूमी नसलेल्यांना उमेदवारी देणे चुकीचे असून, भाजप हा सर्वात मोठा पक्ष नसून केवळ एक फुगा आहे, जो लवकरच फुटेल. सक्षम कार्यकर्ते असतानाही दुसऱ्या पक्षाचे लोक पक्षात घेणे ही भाजपची हतबलता असल्याचे त्यांनी नमूद केले.

संजय शिरसाट आणि राहुल नार्वेकरांवर निशाणा

संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट हे आमच्या उमेदवारांना धमकावत असून माझ्याकडे त्याचे भक्कम पुरावे आहेत, असा खळबळजनक आरोप दानवे यांनी केला. तसेच, राहुल नार्वेकर उमेदवार नसताना निवडणूक केंद्रात कसे काय गेले? असा सवाल उपस्थित करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला.

अधिकारचा गैरवापर आणि निलंबनाची मागणी

निवडणुकीच्या काळात कोणत्याही अधिकाऱ्याला नेत्यांच्या खाजगी बैठकीला जाता येत नाही. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीला जे अधिकारी उपस्थित होते, त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली. "निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवडणुकीव्यतिरिक्त दुसरे कोणतेही काम करता येत नाही, तरीही ते सत्तेच्या दबावाखाली काम करत आहेत," असेही ते म्हणाले.

शिवरायांचा अपमान खपवून घेणार नाही

छत्रपती शिवाजी महाराज हे महान व्यक्तिमत्व असून त्यांच्या बरोबरीने कोणीही स्वतःचा फोटो लावणे हे अत्यंत चुकीचे आहे. असा प्रकार करणाऱ्यांचा त्यांनी तीव्र निषेध केला.

जाहीरनामा आणि पुढील रणनिती

येत्या दोन-तीन दिवसांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध होईल. निवडणूक आयोगाने सत्ताधारी मंत्र्यांकडून उमेदवारांवर टाकला जाणारा दबावाची दखल घ्यावी, असे आवाहन करत त्यांनी 'घोडा मैदान लांब नाही' असा इशारा दिला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+