अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहनाऐवजी करणार दफन; कुटुंबियांनी सांगितले 'हे' मोठे कारण
badlapur case akshay shinde encounter : बदलापूरमधील खाजगी शाळेत चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. अक्षयचा मृतदेह दहन न करता दफन करण्याची इच्छा त्याच्या कुटुंबाने व्यक्त केली आहे. पण मात्र अक्षय शिंदेचे अंत्यसंस्कार बदलापुरात होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका परिसरातील नागरिकांनी घेतली आहे.
यासंदर्भात हायकोर्टाने सूचना दिल्यानंतर आता बदलापूर तसेच डोंबिवलीमध्ये स्थानिक प्रशासनाशी पोलीस चर्चा करत आहेत. ही चर्चा पूर्ण झाल्यावर आज किंवा उद्या अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती मिळत आहे.

बदलापूरच्या शाळेतील चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस येताच अख्खा महाराष्ट्र हादरला. या घटनेप्रकरणी शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला अटकही झाली. मात्र सोमवारी त्याला दुसऱ्या एका केससंदर्भातील चौकशीसाठी तळोजा येथून बदलापूरला घेऊन जात असताना त्याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. व्हॅनमध्ये बसलेल्या अक्षयने पोलिसांवर गोळी झाडल्याने स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी गोळीबार केला, त्यातील एक गोळी अक्षयच्या डोक्याला लागली आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेवरून सध्या बराच गदारोळ सुरू असून हे फेक एन्काऊंटर असल्याचा दावा करत अक्षय शिंदेच्या वडिलांनी कोर्टात धाव घेतली. याप्रकरणी सध्या उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
दरम्यान या घटनेला आता चार दिवस उलटून गेले आहेत. तरी अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले नसून त्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. हायकोर्टाने सरकारला सूचना दिल्यानंतर पोलिसांची स्थानिक प्रशासनासोबत चर्चा सुरू आहे. कुटुंबियांकडून अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी बदलापूर तसेच आसपासच्या परिसरात जागेचा शोध सुरू आहे.
अक्षय शिंदेवर बदलापुरातील मांजर्ली स्मशानभूमी परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र अक्षय शिंदेचे अंत्यसंस्कार बदलापुरात होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका स्थानिक नागरिकांनी "ज्याने आमच्या चिमुकल्यांवर अत्याचार केले, त्याचे अंत्यसंस्कार इतर कुठेही करा, पण बदलापूरमध्ये आम्ही हे होऊ देणार नाही", अशी भूमिका घेतली आहे. तर आम्हाला अक्षयचा मृतदेह दफन करायचा आहे, अशी भूमिका त्याच्या कुटुंबियांनी घेतली होती. मात्र त्यासाठी देखील जागा उपलब्ध होत नाही. यासंदर्भात हायकोर्टाने सूचना दिल्यानंतर आता बदलापूर तसेच डोंबिवलीमध्ये स्थानिक प्रशासनाशी पोलीस चर्चा करत आहेत. ही चर्चा पूर्ण झाल्यावर आज किंवा उद्या अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे समजते.
दहनाऐवजी का करणार दफन?
अक्षय शिंदेच्या वडिलांचे वकील अमित कटारनवरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, अक्षय शिंदेला न्याय मिळवून द्यायचा आहे. भविष्यात काही पुरावे लागले तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल, परंतू मृतदेह पुरण्यासाठीही जागा मिळत नाही, दफनविधीसाठी पोलिसांनी जागा उपलब्ध करून द्यावी आणि यासंदर्भात महानगरपालिकेशी बोलावं असं सांगितलं आहे. अशी माहिती कटारनवरे यांनी दिली.












Click it and Unblock the Notifications