Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आखिलेश यादवांनी गायले बांग्लादेश, पाकिस्तानचे गोडवे..? धुळ्यात येत मोदी सरकारला धूतले

महाविकास आघाडीच्या जागावाटपाची वाट न पाहता समाजवादी पक्षाने महाराष्ट्रातील चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. मविआच्या जागावाटपात सपाला सहा जागा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. समाजवादी पक्षाने मानखुर्द शिवाजीनगर येथूल अबू असीम आझमी, भिवंडी पूर्वमधूम रईस शेख, भिवंडी पश्चिममधून रियाझ आझमी आणि मालेगावमधून सासने हिंद यांची उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, मालेगावनंतर आज धुळ्यात त्यांची प्रचारसभा झाली. या प्रचारसभेत त्यांनी आपल्या शेजारील मुस्लिम राष्ट्रांवर स्तुतिसुमने उधळत मोदी सरकारवर कडाडून टिका केली.

अखिलेश यादवांनी केले मुस्लिम राष्ट्रांचे कौतूक

पाकिस्तानात महागाईचा कहर आणि बांगलादेशात बँकांमध्ये खडखडाट असला, तरी आज उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी धुळ्यात येऊन या दोन्ही देशांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन भारताची बदनामी केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी विरोधकांनी केला होता. आज अखिलेश यादव यांनी धुळ्यात येऊन मोदी व भारताची बदनामी केल्याच्याही चर्चा रंगल्या.

Akhilesh Yadav

काय म्हणाले अखिलेश यादव

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत समाजवादी पार्टीचा प्रचार करण्यासाठी अखिलेश यादव मालेगाव आणि धुळ्यात आले होते. या दोन्ही मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये त्यांनी प्रचाराची भाषणे केली. यावेळी बोलताना अखिलेश यादव म्हणाले, मोदी सरकार भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकाची झाल्याच्या बाता मारते. परंतु, माझ्याकडे जी आकडेवारी आहे, ती खरी असेल तर नुकत्याच जागतिक पातळीवर प्रसिद्ध झालेला भूकबळींचा इंडेक्स पाहिला तर पहिल्या पाच देशांत भारताचे नाव आहे. भारतात भूकबळींची संख्या वाढल्याचे त्या आकडेवारीवरून दिसते. त्या उलट भारताच्या शेजारच्या दोन्ही देशांची कामगिरी यामध्ये चांगली आहे. त्या दोन्ही देशांमध्ये भूकबळी नाहीत, असा दावा अखिलेश यादव यांनी केला.

मोदी सरकारवर साधला निशाणा

आजच्या भाषणात अखिलेश यादव यांनी मोदी सरकारव निशाणा साधला. त्याचे आजचे भाषण चांगलेच चर्चीले गेले. भारतात भूकबळी वाढल्याचे सांगत अखिलेश यादव यांन मात्र शेजारचे देश कसे चांगले आहेत, हेही सांगितल्याने या मुद्द्यावर आता सत्ताधाऱ्यांकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+