Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आधी व्हिडीओवर बाजू मांडली, मग आत्मसमर्पण केले; अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात

कल्याण येथील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणातील फरार आरोपी अखिलेश शुक्ला याने पोलिसांत आत्मसमर्पण केल्याची बातमी समोर आली आहे. शुक्लाने आज सकाळीच स्वतःची बाजू मांडणारा व्हिडीओ व्हायरल केला होता. खडकपाडा पोलिसांकडे त्याने आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे. शेजाऱ्यांमधील हा वाद परप्रांतिय प्रकरणाशी जोडला गेलाय, असा थेट आरोप त्याने केलाय.

Akhilesh Shukla

काय होतं नेमकं प्रकरण

कल्याण येथील हायप्रोफाईल सोसायटीत देशमुख कुटुंबाला त्याच्या शेजारच्या परप्रांतिय कुटुंबाने मारहाण केली होती. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची चर्चा थेट विधानसभेपर्यंत पोहोचली होती. पोलिसांनी तातडीने या प्रकरणात पावले उचलत दोन जणांना अटक केली. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला अखिलेश शुक्ला फरार होता. सर्वच राजकीय नेत्यांनी या प्रकरणावर स्टेटमेंट दिल्यावर हे प्रकरण महाराष्ट्रभर गाजले. मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज या प्रकरणातील शुक्ला याने आपली बाजू मांडणारा व्हिडीओ व्हायरल केला.

काय म्हणाला शुक्ला?

या व्हिडीओत शुक्ला म्हणतोय, "वर्षापूर्वी मी माझ्या घरचं इंटेरियर केलं. तेव्हा चप्पल-बूट ठेवण्याचा रॅक हा डाव्या बाजूहून उजव्या बाजूला आणला. त्यानंतर माझ्या शेजारी राहणारे देशमुख व कलकुट्टे कुटुंबाने आक्षेप घेऊन वाद घातला. रॅक दुसरीकडे ठेवा म्हणत गेल्या वर्षभरापासून हे दोन्ही कुटुंब मला त्रास देत होते. माझ्या पत्नीला रोज शिवीगाळ करणे, उलटसुलट बोलणे सुरु होते. दोन दिवसांपूर्वी माझी पत्नी दरवाजाबाहेर धूपबत्ती लावताना कलकट्टे काकूंनी अगरबत्ती लावू नका म्हणत, आम्हाला येथे राहू देणार नाही असा दम दिला. नंतर माझ्या पत्नीला शिवीगाळ केली. त्यानंतर तिथे देशमुख कुटुंबिय आले. धीरज देशमुख आणि त्यांचे लहान भावाने माझ्या पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली. माझ्या पत्नीचे केस खेचून कानशिलात लगावली, असा दावा अखिलेश शुक्ला यांनी केला.

परप्रांतीय विषयात तथ्य नाही

शुक्ला म्हणाले, "आम्हाला इथे शंभर वर्ष झाली आहेत. माझे मित्र हे मराठी भाषिकच आहेत. मी सुद्धा महाराष्ट्राचाच आहे. महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि सन्मानीय बाळासाहेब हे माझेही दैवत आहेत. देशमुख कुटुंबियांनी माझ्या पत्नीला मारहाण केली, शिवीगाळ केली. या बचावासाठी आम्ही हे केलं. त्यानंतर या लोकांनी परप्रांतीय विषय पुढे केला. या लोकांनी मूळ विषय डावलला आणि नको तो मुद्दा उभा केला आहे. म्हणून मी या व्हिडीओतून आपल्या सर्वांना विनंती करतो की, याचं खरं रुपही आपण बघावं. सर्व माझ्या मराठी बांधवांनी आम्हालाही सहकार्य करावं. जय हिंद जय महाराष्ट्र", असं अखिलेश शुक्ला म्हणाला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+