Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

वा रे वा! अजित दादांचे कार्यकर्ते! राष्ट्रवादी कार्यालयातच उडवला लावणीचा 'ठसका', Video व्हायरल!

Ajit Pawars NCP Office Lavani Dance Video Viral : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपूर येथील गणेशपेठ कार्यालयात आयोजित दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमातील एका घटनेमुळे सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

या कार्यक्रमात पक्षाच्या एका महिला पदाधिकाऱ्याने केलेल्या लावणीच्या सादरीकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. रविवारी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा सांस्कृतिक कार्यक्रम काही क्षणातच चर्चेचा विषय बनला, जेव्हा कार्यक्रमातील लावणीचे दृश्य मोबाईलवर रेकॉर्ड होऊन सोशल मीडियावर वेगाने पसरले. त्यामुळे जोरदार टीका होऊ लागली आहे तर काही लोक याचे कौतुक करू लागलेत.

NCP Office Lavani Dance Video

लावणीचा ठसका आणि उत्साही प्रतिसाद

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूरमधील महिला पदाधिकारी आणि प्रसिद्ध नृत्यांगना शिल्पा शाहीर यांनी लावणी सादर केल्याचे दिसत आहे.

त्यांच्या या सादरीकरणाला उपस्थितांकडून, विशेषतः तरुण कार्यकर्त्यांकडून, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यकर्त्यांनी दिलेल्या 'वन्स मोर'च्या घोषणांमुळे त्यांनी पुन्हा एकदा नृत्य सादर केले.

राजकीय कार्यालयात झालेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचे चित्रीकरण उपस्थितांनी केले आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पक्षाच्या या 'स्नेहमिलन' कार्यक्रमावर राजकीय चर्चांना उधाण आले.

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले स्पष्टीकरण!

या व्हायरल व्हिडिओमुळे टीका सुरू होताच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर आणि जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ताकसाडे यांनी सांगितले की, "हा कार्यक्रम पूर्णपणे सांस्कृतिक आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला. यात महिला आणि पुरुष कार्यकर्ते दोघेही उपस्थित होते आणि हे सर्व एका पारिवारिक वातावरणात झाले."

महाराष्ट्राची ओळख

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, "लावणी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. तिचा अवमान होऊ नये आणि तिचा चुकीचा अर्थ लावू नये." शिल्पा शाहीर या नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपाध्यक्ष असून, त्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्या सादरीकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे.

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लावणीचा हा कार्यक्रम केवळ 'कौटुंबिक दिवाळी स्नेहमिलन' असल्याचे सांगत, याला राजकीय दृष्टिकोनातून पाहणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. एकंदरीत, दिवाळीच्या निमित्ताने आयोजित एका सांस्कृतिक कार्यक्रमातून निर्माण झालेला हा वादंग, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+